Amravati News : अनिल बोंडे अन् शिवव्याख्यते उमाळे मंचावरच भिडले; नेमकं काय घडलं?

Anil Bonde News : या घडलेल्या प्रकाराची अमरावतीत चर्चा होत आहे.
Anil Bonde
Anil BondeSarkarnama

Amravati News : भाजप खासदार अनिल बोंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संघटक व शिवव्याख्याते तुषार उमाळे यांच्यामध्ये जोरदार घमासान झाल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे तर शिवजयंतीच्या भर कार्यक्रमात एकमेकांना अरेरावीची भाषा केल्यामुळे या कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.

पोलिसांनी आणि आयोजकांनी तात्काळ मध्यस्थी करत दोघांचीही समजूत घालत कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. मात्र, या घडलेल्या प्रकाराची चर्चा अमरावतीत होत आहे.

Anil Bonde
Officer Dispute : फेसबूक पोस्टवरून IAS-IPS महिला अधिकारी भिडल्या; सरकारने थेट उचललं 'हे' पाऊल

नेमकं काय घडलं?

19 फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंतीचे औचित्य साधून अमरावतीमध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते तुषार उमाळे उपस्थित होते.

यावेळी तुषार उमाळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले याबाबत सांगत होते. मात्र, याच दरम्यान, अनिल बोंडे यांनी उमाळे यांच्या भाषणात हस्तक्षेप केला आणि म्हणाले, 'ए शहाण्या मूर्ख आहेस का? हे बंद कर'. यानंतर अनिल बोंडे जागेवरून उठून तुषार उमाळे यांच्या दिशेने गेले.

Anil Bonde
Chhagan Bhujbal : विधानभवन, लोकसभेतील कार्यलये झाले, आता 'मोतोश्री'वर दावा सांगणार का; भुजबळांचा सवाल

यावेळी तुषार उमाळे यांनीही, 'तुम्ही मुर्ख असाल', असे अनिल बोंडे यांना म्हटले. यानंतर पोलीस आणि आयोजकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

यानंतर तुषार उमाळे यांनी यावर बोलत ''तुम्ही लोकप्रतिनिधी असा किंवा कोणीही. असा आगाऊपणा खपवून घेतल्या जाणार नाही. महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे. ज्याला ऐकायचं तो ऐकेल. ज्याला नसेल ऐकायचं ते चुपचाप निघून गेले तरी चालेल'', असं ते म्हणाले.

Anil Bonde
Dhanorkar : २०१४ पासूनच सुरू झाली महाभारताची पुनरावृत्ती, मनगटात ताकद संयम ठेवावा लागेल !

दरम्यान, या घडलेल्या प्रकारामुळे कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. पण लगेच पोलिसांनी आणि आयोजकांनी मध्यस्थी करत पेटलेला वाद मिटवला. यानंतर कार्यक्रम पुढे सुरळीत पार पडला. मात्र, या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com