आता आपले राज्यपाल समुद्रातील लाटा मोजत बसले आहेत का; राऊत चिडले...

हे तिन्ही निर्णय या सरकारने फिरवले, हे जर खरे असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.
Eknath Shinde, Bhagatsingh Koshyari, Devendra Fadanvis and Sanjay Raut.
Eknath Shinde, Bhagatsingh Koshyari, Devendra Fadanvis and Sanjay Raut.Sarkarnama

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने जे पाच निर्णय घेतले होते, त्याला या सरकारने स्थगिती दिली. त्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले, उस्मानाबादचे नाव धाराशिव केले आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हे तिन्ही निर्णय या सरकारने फिरवले, हे जर खरे असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

उपरोक्त तिन्ही मागण्यांसाठी हेच लोक तेव्हा मागण्या करीत होते, आंदोलने करीत होते. आता स्वतः सत्तेत असताना मात्र त्याच निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारची परवा न करता अत्यंत हिमतीने हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलवली आणि मुंबई (Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. शिंदे- (Eknath Shinde) फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने जर हे निर्णय फिरवले असतील, तर त्यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, असेच म्हणावे लागेल.

हे सरकार घटनाबाह्य आहे, अशा प्रकारे निर्णय फिरवण्याचा अधिकार या सरकारला नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ह निर्णय फिरवून सरकारने काय साध्य केले, हा प्रश्‍न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नाही. खऱ्या अर्थाने फडणवीसच मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही राऊत यांनी हाणला.

या राज्यात येवढ्या घटनाबाह्य गोष्टी आहेत आणि राज्यपाल काय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत का, असा खोचक सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. राज्यात काय सुरू आहे, कळायला मार्ग नाही. दोघेच बैठका घेऊन निर्णय घेत आहेत. चिठ्ठ्या काय देतात, माईक काय खेचतात, शर्ट काय ओढतात… सर्व मजा मस्करी सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde, Bhagatsingh Koshyari, Devendra Fadanvis and Sanjay Raut.
Video : आता राज्यपाल कुठं गायब झालेत? -संजय राऊत

या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. हे सरकार गोंधळलेलं आहे. त्यांचा मेंदू बधिर झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या लोकहितकारी निर्णयांनासुद्धा स्थगिती दिली जात आहे. हे दुर्दैवी आहे. राजकीय किंवा आर्थिक विषयांत असे केले तर समजले जाऊ शकते. पण जनतेच्या भावनांशी जुळलेले निर्णय सरकारने फिरवू नये, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com