Mahavikas Aghadiकडून शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांचा अर्ज दाखल

Nagpur : ज. मो. अभ्यंकर यांनी ३० डिसेंबर २०२२ला नाकाडेंच्या नावाची घोषणा केली होती.
Gangadhar Nakade, Mahavikas Aghadi.
Gangadhar Nakade, Mahavikas Aghadi.Sarkarnama

Nagpur Teachers Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघातून माजी शिवसैनिक धिरज लिंगाडे यांना मैदानात उतरविल्यानंतर आज सायंकाळी नागपूर शिक्षक मतदारसंघासाठीही महाविकास आघाडीचा निर्णय झाला आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर विश्र्वेश्‍वरराव नाकाडे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला.

शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी ३० डिसेंबर २०२२ला नाकाडेंच्या नावाची घोषणा केली होती. नागपूर (Nagpur) शिक्षक आणि अमरावती (Amravati) पदवीधर या दोन्ही जागा आम्हीच लढवू, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. तेव्हा त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवला नाही. पण आज त्यांनी केलेली घोषणा खरी ठरली. ‘सरकारनामा’ने त्याच दिवशी हे वृत्त दिले होते. भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन दाखल करणार आहेत.

गंगाधर विश्वेश्वरराव नाकाडे यांनी नामांकन अर्ज सादर केला तेव्हा शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे, सह संघटक सतीश हरडे, जिल्हाप्रमुख राजू हरणे, युवा सेनेचे नागपूर जिल्हा युवा अधिकारी शरद सरोदे, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे, सुरेखा खोब्रागडे, सुशिला नायक तसेच युवा सेनेचे पंकज अहिरराव, प्रवीण अहिरराव यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gangadhar Nakade, Mahavikas Aghadi.
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

गेल्या ५ वर्षांपासून आमच्या उमेदवारांचे या क्षेत्रात मोठे काम आहे. गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी त्यांनी संपर्क केलेला आहे. शिक्षकांचे प्रश्‍न, मग ते राज्य पातळीवरचे असो किंवा जिल्हा पातळीवरचे, ते सोडवण्याचे काम आमच्या लोकांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिक्षक सेनेसोबत दोन्ही मतदारसंघातील शिक्षक शक्तीनिशी उभे राहतील. महाविकास आघाडी मिळूनच हे उमेदवार ठरलेले आहेत आणि आम्ही एकत्र मिळूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे अभ्यंकर यांनी सांगितले. या निवडणुकीत आम्हालाच यश मिळेल, याची खात्री अभ्यंकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in