Buldhana Crime: अपनी रानी किसी और की..! व्हॉट्सअॅप स्टेटस् ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाने संपवले जीवन

गेल्या बऱ्याच वर्षांपासून गजाननचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते.
Buldhana Crime:
Buldhana Crime:Sarkarnama

Buldhana Crime News : बुलडाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', असं स्टेटस ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाने आपले जीवन संपवले आहे.या घटनेमुळे संपूर् जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गजानन गुरव असं २६ वर्षीय आत्महत्या करणाऱ्या काँग्रेस (Congress) शहराध्यक्षाचं नाव आहे. देऊळगाव राजा पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या बऱ्याच वर्षांपासून गजाननचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र,अचानक या तरुणीने दुसऱ्यासोबत आपलं सूत जुळवलं. यामुळे गजाजन काही दिवसांपासून नैराश्यात होता.याच नैराशयातून गजाननने गावातील खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.गजानन बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा (Buldhana) तालुक्यातील देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचा शहराध्यक्ष होता.

Buldhana Crime:
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस शुद्ध-पवित्र, मग 1 कोटींची लाच देणारे तुमच्या स्वयंपाक घरात पोहोचले कसे ?

गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेंडने धोका दिल्याने तो नैराश्यात होता. प्रेमात मिळालेल्या या धोक्यातून गजनानने १६ मार्चला व्हॉट्सअॅप स्टेटस आणि इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर व्हिडीओ स्टेटस ठेवत आयुष्य संपवले. "अपनी रानी किसी की दीवानी हो गई" असे स्टेटस त्याने ठेवले होते. यासोबतच आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा लिहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in