APMC Akola Election : अकोल्यात ठरलं; शिवसेना पाळणार महाविकास आघाडीचा धर्म !

Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दंड थोपटले आहे.
APMC Akola
APMC AkolaSarkarnama

Akola District APMC Election : कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेत असलेल्या सहकार पॅनेलच्या विरोधात यंदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दंड थोपटले आहे.

या निवडणुकीत अकोला बाजार समितीमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील सहकार पॅनलसोबत असून, शिवसेनेतील बंडखोर उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ दिली आहे. अकोला बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी सहकार पॅनलकडून सेवा सहकारी संस्था मतदार संघात (सर्वसाधारण) शिरीष वसंतराव धोत्रे, ज्ञानेश्‍वर महल्ले, अभिमन्यू वक्टे, राजेश बेले, सचिन वाकोडे, रामेश्‍वर वाघमारे, भरत काळमेघ असे सात जण रिंगणात आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघ (इतर मागासवर्ग राखीव) गटात मुकेश मुरुमकार, सेवा सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण भटक्या, विमुक्त जमाती राखीव) दिनेश नागे, सेवा सहकारी संस्था मतदारसंघ ( सर्वसाधारण महिला राखीव) माधुरी श्‍याम परनाटे, शालिनी गजानन चतरकार, ग्रामपंचायत मतदार संघ (सर्व साधारण) विकास पागृत, वैभव माहोरे, ग्रामपंचायत मतदार संघ (अनुसूचित जाती, जमाती राखीव) दिनकर वाघ, ग्राम पंचायत मतदार संघ (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) संजय गावंडे रिंगणात आहेत.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, सरपंच संघटना, शिव शेतकरी पॅनलकडून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नितीन ताथोड यांच्यासह सतीश उभे, किशोर जामनिक, प्रशांत राऊत, पवन बुटे, सुधाकरराव पाटील, पवन माधवराव बुटे, प्रा. जयश्री नवलकार, शीलाबाई शेळके रिंगणात उतरल्या आहेत.

APMC Akola
Bhandara APMC Election : भंडाऱ्यात भाजपची पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती, फडणवीसांच्या ‘त्या’ वाक्याची झाली आठवण !

सहा उमेदवार अविरोध..

अकोला बाजार समितीमध्ये सहकार पॅनलच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आव्हान दिले असले तरी त्यांना पुरेश उमेदवार उभे करता आले नाही. त्यामुळे सहकार पॅनलचे सहा उमेदवार हे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर अविरोध झाले आहेत. त्यात सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील पाच आणि महिला गटातील एका उमेदवाराचा समावेश आहे.

शिव शेतकरी पॅनलशी संबंध नाही..

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) व शिव शेतकरी पॅनलने अकोला बाजार समितीसाठी (APMC Election) उमेदवार जाहीर करताना शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले आहे. याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्याकडे विचारणा केली असता महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

APMC Akola
Arni APMC Election : आर्णी बाजार समिती निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले सख्खे काका-पुतणे...

शिव शेतकरी पॅनलशी शिवसेनेचा (Shivsena) संबंध नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे छायाचित्र वापरल्याबाबत जवाब मागू. नितीन ताथोड यांना पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते. त्यांनी ती घेतली नाही. पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दातकर यांनी स्पष्ट केले.

Edited By : Atul Meheres

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com