असे कठोर निर्णय घेतले, तरच देशविरोधी कारवायांना पायबंद घालता येईल...

आतंकवादी चळवळीशी ज्यांचा संबंध आहे, त्यांचे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश देणारा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने घेतला आहे.
Shivray Kulkarni on PM Narendra Modi's Decision.
Shivray Kulkarni on PM Narendra Modi's Decision.Sarkarnama

नागपूर : भारतामध्ये दहशतवादाला थारा नाही आणि आतंकवादी चळवळीशी ज्यांचा संबंध आहे, त्यांचे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश देणारा निर्णय आज पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने घेतला आहे. पीएफआयवर बंदी घातली गेली, हा देशासाठी अतिशय चांगला निर्णय आहे, असे भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) म्हणाले.

गेल्या काही काळापासून अमरावती (Amravati) हे संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला अमरावतीला रजा अकादमीने मोर्चा काढला आणि त्या भव्य मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला गेला. दुकाने लुटली गेली, रस्त्याने जाणाऱ्या महिलांची छेड काढली गेली, दगडफेक करण्यात आली. या प्रकारची दहशत अमरावतीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापूर्वी सीआयएच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हाही दगडफेक झाली. काश्मीरमधल्या आसीफा नावाच्या एका बालिकेवर अत्याचार झाला. म्हणून अमरावतीमध्ये मोर्चा काढून तेव्हा दगडफेक करण्यात आली.

या सर्वांपेक्षा भयंकर प्रकरण म्हणजे, पशू वैदकीय दुकान चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या सर्व घटनांनी अमरावती संवेदनशील बनलेले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. ही सर्व प्रकरणे बघता अमरावती आता अतिसंवेदनशील झालेले आहे आणि हे करण्यामध्ये पीएफआयसारख्या संघटना कारणीभूत आहेत. त्यामुळे पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अगदी योग्य आहे आम्ही अमरावतीकर म्हणून या निर्णयाचे स्वागत करतो, असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.

Shivray Kulkarni on PM Narendra Modi's Decision.
पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा ; PFI संघटनेच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक

अशी पद्धतीने कठोर निर्णय घेतले गेले, तरच देशविरोधी कारवायांना पायबंद घालता येणार आहे. या निर्णयामुळे पीएफआयसारख्या इतर संघटनांनाही जरब बसली आहे. आता उमेश कोल्हे हत्याकांडासारखी प्रकरणे घडणार नाही, याची दक्षता यंत्रणा घेईलच. कारण केंद्र सरकारच्या आज घेतलेल्या निर्णयामुळे यंत्रणेलाही बळ मिळाले आहे. लव्ह जिहादची प्रकरणे कुठे घडत असतील, तर नागरिकांनी जागरूक राहून पोलिसांना वेळीच माहिती देणे गरजेचे आहे, असेही शिवराय कुळकर्णी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in