अनिल देशमुखांना मोठा झटका : सीबीआय प्रकरणातील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार; विशेष सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : कथित शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणात अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज आज (ता. २१ ऑक्टोबर) विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे. ईडीच्या प्रकारणात जामीन मंजूर झाल्यानंतर सीबीआयच्या (CBI) प्रकारणातही जामीन मिळावा, यासाठी देशमुख यांच्याकडून अर्ज करण्यात आला हेाता. (Anil Deshmukh's bail plea in CBI case rejected)

दरम्यान, सत्र न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे माजी गृहमंत्री देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. ईडीच्या प्रकरणात देशमुख यांना जामीन मंजूर झाला होता. त्याच पद्धतीने सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळेल, अशी अपेक्षा देशमुख यांना होती. मात्र विशेष सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Anil Deshmukh
क्षीरसागरांचा चकवा कोणाला? : शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले!

देशमुख मागील वर्षीच्या नोव्हेंबरपासून अटकेत आहेत. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन कायम ठेवला आहे. मात्र, अद्याप सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांचा मुक्काम कारागृहात होता. त्यामुळे त्यांनी सीबीआय प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयात या अर्जाला सीबीआयने विरोध केला होता. देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून खंडणी वसूल केली आणि याबाबत पुरेसे पुरावे आहेत, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता.

Anil Deshmukh
भास्कर जाधव चिपळूण-गुहागरमधून निवडून कसे येतात?, तेच आता बघू : दरेकरांचे चॅलेंज

दरम्यान, कथित शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणात निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार करण्यात आलेले आहे. तसेच, देशमुख यांचा मुलगा सलील यांना याची माहिती होती. तसेच, वाझे आणि आरोपी संजय पाटील यांचे मोबाईल संभाषण सीबीआयकडे आहे, असा दावा अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी केला होता. देशमुख यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असा बचाव त्यांनी केला होता. देशमुख सध्या हृदयविकाराने त्रस्त आहेत. विशेष न्या. एस. एच. गवलानी यांनी गुरुवारी यावर सुनावणी पूर्ण केली होती. त्या सुनावणीवरील निकाल आज कोर्टाने दिला आहे.

Anil Deshmukh
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com