Bjp Leader Anil Bonde-Cm Uddhav Thackeray
Bjp Leader Anil Bonde-Cm Uddhav ThackeraySarkarnama

Anil Bonde : शिशुपालासारखे शिवसेनेचे शंभर अपराध भरायला आलेत...

मुळात मुख्यमंत्री जर राणा दाम्पत्यांला भेटले असते, थोडा समजुतदारपणा दाखवला असता तर सगळा प्रकार थांबवता आला असता. (Anil Bonde)

अमरावती : शिशुपालासारखे शिवसेनेचे शंभर अपराध आता भरत आले आहेत, आणि म्हणून त्यांची ही शेवटची फडफड आहे. शिवसेनेने (Shivsena) आपली सगळी ताकद मुंबईला लावली, ती ही नवनीत राणा सारख्या एका महिलेसाठी. (Bjp) घाणेरड्या शिव्या त्यांना देण्यात आल्या महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही, अशा शब्दात राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेनेवर टीका केली.

अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना काल मुंबईत खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी जो गोंधळ घातला, याबद्दल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला. (Vidharbh) राज्यात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्यांला अखेर माघार घ्यावी लागली.

परंतु त्यांच्या या हट्टामुळे मुंबईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खार पोलिसांनी नवनीत व रवि राणा या दोघांना अटक केली. या सगळ्या घटनाक्रमानंतर राज्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून सगळ्यांनीच ठाकरे सरकारवर तोफ डागायला सुरूवात केली आहे.

ज्या अमरावतीतून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जाण्याचा निर्णय राणा दाम्पत्यांनी घेतला होता, त्या अमरावतीतील भाजपचे नेते, राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी तर ठाकरे सरकारची तुलना शिशुपालाशी केली. बोंडे म्हणाले, जसं शिशुपालाचे शंभर अपराध भरले होते, तसेच शिवसेनेचे देखील शंभर अपराध भरत आले आहेत. एका महिलेसाठी शिवसेनेने आपली सगळी ताकद मुंबईत लावली, खालच्या स्तरावर जाऊन त्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या.

महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे, त्यांना ते कधीही सहन होणार नाही, आणि ते विसरणार देखील नाही. विशेष म्हणजे मुंबई पोलिस ज्यांचा जगभरात लौकिक आहे, त्यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बटकी बनवून ठेवले आहे. ज्या पद्धतीने पोलिस वागले ते पाहून आश्चर्य वाटले.

Bjp Leader Anil Bonde-Cm Uddhav Thackeray
कराडांच्या हट्टापुढे दानवे नमले ; शंभर कोटी खर्चून औरंगाबादेतही होणार रेल्वे पीट लाईन..

मुळात मुख्यमंत्री जर राणा दाम्पत्यांला भेटले असते, थोडा समजुतदारपणा दाखवला असता तर सगळा प्रकार थांबवता आला असता. पण त्यांना पोलिसांवर देखील विश्वास नसल्याने त्यांनी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले. दिवा जसा शेवटी फडफडतो तशी शिवसेनेची ही शेवटची फडफड आहे. राज्यातील जनतेला हे अजिबात आवडलेले नाही आणि याचा जाब लोक निवडणूकीत निश्चित विचारतील.

उत्तर प्रदेशात जशी यादवांची गुंडगिरी होती, ती लोकांनी लक्षात ठेवली आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा मुलायम यादव यांचा मुलगा उभा राहिला तेव्हा लोकांनी त्याला पराभूत करून घरी बसवलं. तशीच परिस्थीती महाराष्ट्रात देखील पहायला मिळाली तर नवल वाटायला नको. दुसरे शिवसेनेचे नेते संजय राऊत ते देखील वेड्या सारखे बरळत असतात. राज्यात मुख्यमंत्र्यांनी आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण केली असल्याचा पुनरुच्चार देखील बोंडे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com