Fadanvis : आंधळगाव गोतस्करी प्रकरण; होमगार्डच निघाला मुख्य सूत्रधार, गृहमंत्र्यांची एंट्री?

या प्रकाराची तक्रार माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्याचे गृहमंत्री (Home Minister) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केल्याने आता या प्रकरणात गृहमंत्र्यांनी एंट्री केल्याची माहिती आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या आंधळगाव गोतस्करी प्रकरणात एक होमगार्डच मुख्य सूत्रधार निघाला. आणखी धक्कादायक म्हणजे पोलिसच (Police) गोतस्करांच्या पाठीशी असल्याने जिल्ह्यात गोतस्करी वाढली असल्याचा गंभीर आरोप, माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे संबंधित होमगार्डच्या खात्यात गोतस्करांद्वारे ऑनलाइन पेमेंट आले असून त्यानंतर आंधळगावचे निलंबित ठाणेदार, त्यांचे सहकारी आणि संबंधित अटकेतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या खात्यात तो होमगार्ड पैसे टाकत असल्याच्या आरोप वाघमारे यांनी केला आहे. गोतस्करीच्या पैशांतून संबंधित अधिकाऱ्याने जमिनी व प्रॉपर्टी घेतल्याचे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले गेले आहे. आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे खंडणीचा गुन्हा संबंधित निलंबित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यावर दाखल करावा, अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे.

या प्रकाराची तक्रार माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्याचे गृहमंत्री (Home Minister) तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केल्याने आता या प्रकरणात गृहमंत्र्यांनी एंट्री केल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील मोहम्मद उस्मान वल्द मोहम्मद सुबान (वय ३७ आणि शेख मोहसीन नाशिर (वय ३०) हे दोघे बुधवारच्या रात्री भंडारा जिल्ह्यातील बघेडा इथून म्हैस घेऊन त्यांच्या वाहनाने कामठीकडे निघाले असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री गावाजवळ काही तरुणांनी त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन न थांबल्याने बजरंग दलाच्या तरुणांनी वाहनावर दगडफेक केली. यात वाहनातील दोघेही जखमी झाले.

वाहक मोहम्मद उस्मान गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कामठी येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून भंडारा पोलिसांनी रात्री आठ आरोपींना अटक केली होती. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी, ठाणेदार सुरेश मट्टामी आणि पोलीस कर्मचारी सचिन नारनवरे यांनी हे प्रकरण हाताळताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे. आंधळगावचे ठाणेदार म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Devendra Fadanvis
Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा आदित्य ठाकरेंना दणका

दरम्यान आज माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना तक्रार दिली आहे. होमगार्ड गोतस्करांकडून ऑनलाइन पैसे जमा करत असून तोच निलंबित ठाणेदार व इतर पोलिस अधिकारी व अटकेतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना वाटत असल्याच्या आरोप केला आहे. शिवाय संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गोंतस्करिच्या पैशांतून जमिनी व प्रॉपर्टी खरेदी केली असून त्यांची चौकशी करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे. तर आता तुरुंगातील आरोपींप्रमाणे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी गृहमंत्री यांच्या स्तरावर होणार असल्याने भंडारा जिल्ह्यातील गोतस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com