...आणि म्हणून विद्यार्थ्यांनी नदी पात्रातून केला पंकजा मुंडेंना व्हिडिओ कॉल !

पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप नेते डॉ. सुनील कायंदे (Sunil Kayande) यांनी पुढाकार घेऊन भाजप नेत्या पंकजा मुंढे (Pankaj यांना व्हिडिओ काॅल केला. मग विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संंवाद साधला.
Students call to Pankaja Munde
Students call to Pankaja MundeSarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील जळगाव व पिंपळगाव बु या गावाना जोडणारी आमना नदी आहे. दोन्ही गावांना जोडण्यासाठी पूल नसल्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना (School Students) त्रास करावा लागतो. अनेक वर्षांपासून येथे पुलाची मागणी होत आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या (Administration) अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे.

सदर पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप नेते डॉ. सुनील कायंदे (Dr. Sunil Kayande) यांनी पुढाकार घेऊन भाजप नेत्या पंकजा मुंढे (Pankaja Munde) यांच्याकडे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी आमना नदीवर पूल व्हावा म्हणून गावकरी विद्यार्थ्यांनी चक्क आमना नदी पात्रातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्याशी संवाद साधून लवकरात लवकर फुल तयार करण्याची मागणी केली. जळगाव व पिपळगाव या दोन्ही गावांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या आमना नदीवर पूल नसल्याने दोन्ही गावातील विद्यार्थी, वयोवृद्ध, नागरिकांना पुलाच्या पाण्यातून मोठी कसरत करत प्रवास करावा लागतो.

दररोज जाणारे विद्यार्थी तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन या पुराच्या पाण्यातून प्रवास करतात. नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढल्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून पाणी असताना सुद्धा जीवघेणा प्रवास करावा लागतो. हा पुल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून डॉ.सुनील कायंदे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंढे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांची दखल घेऊन पंकजा मुंढे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या व पुलाचे काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.

Students call to Pankaja Munde
शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल का ? पंकजा मुंडे म्हणाल्या..

सिंदखेड राजा मतदारसंघातील जळगाव व पिपळगाव बु येथील दोन्ही गावाना जोडणारा पुल तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी आमना नदी पात्रातून समस्या मांडल्या. याची तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या पुलाचे काम मार्गी लावण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला आहे. पंकजा मुंडे ह्या प्रवासामध्ये असतानाच त्यांनी ग्रामस्थांसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला तसेच संवाद संपल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com