…आणि म्हणून चित्रा वाघ यांनी केले नागपूर पोलिसांचे कौतुक !

भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोशामधून एक लाखाचा एक निधी पक्षातर्फे त्या कुटुंबाला देत आहोत, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

नागपूर : जिल्ह्यातील उमरेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर आठ ते नऊ जणांनी अत्याचार केला. दुसऱ्या प्रकरणाची चौकशी करीत असताना नागपूर ग्रामीण पोलिसांनe या घटनेचा सुगावा लागला आणि त्यांनी सुमोटोमध्ये या प्रकरणात चौकशी केली आणि आरोपींना पकडलेसुद्धा. यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. उमरेड येथे त्या मुलीच्या घरी भेट देण्यासाठी त्या आज येथे आल्या आहेत.

उमरेडला जाण्यासाठी नागपुरात (Nagpur) पोहोतताच विमानतळावर (Nagpur Airport) चित्रा वाघ (Chitra Wagh) पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आपण पाहिलं उमरेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जवळपास आठ ते नऊ जणांनी सामूहिक अत्याचार केला. त्या संदर्भात त्या मुलीची आणि तिच्या परिवाराची भेट घेण्यासाठी मी आणि माझे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नागपूर ग्रामीणचे अरविंद गजभिये आणि त्यांची टीम आम्ही सर्व त्या ठिकाणी जात आहोत. या केसमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांचं (Police) कौतुक केलं पाहिजे. कारण एका वेगळ्या केस मध्ये इन्वेस्टीकेशन चालू असताना त्यांना त्या ठिकाणी काही सुगावा लागला आणि त्यातूनही भयंकर अशी घटना समोर आली.

कुणीही तक्रार न करता सुमोटोमध्ये त्यांनी या प्रकरणाचं इन्वेस्टीगेशन केलं आणि आरोपींना पकडलंसुद्धा. म्हणून त्यांचं कौतुक आहे. पिडीत मुलीला वडील नाही. मुलीची आई आणि मुलगी त्या ठिकाणी राहते. त्यांची अशी परिस्थिती आहे आणि सांपत्तिक परिस्थिती पण ठीक नाहीये. महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून मनोधैर्य योजनेच्या मार्फत जी मदत दिली जाते, ती तात्काळ देण्याबाबतची विनंती आम्ही संबंधित खात्याला करतच आहोत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोशामधून एक लाखाचा एक निधी पक्षातर्फे त्या कुटुंबाला देत आहोत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. याबाबत विचारले असता, महाराष्ट्रामध्ये राहणारा हा प्रत्येक जण महाराष्ट्रीयन आहे आणि त्या प्रत्येकाचं योगदान काही ना काही स्वरूपात आपल्याला मिळत आहे. बरेच पक्ष असे आहेत ज्यांच्यामध्ये गुप्ता आहेत, शर्मा, वर्मा आहेत. पण ते सर्व मराठी आहेत आम्ही तर लहानपणापासून मुंबईत राहतोय महाराष्ट्रात राहतोय. त्यामुळे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा हातभार आहे. प्रत्येक जण हा महाराष्ट्रीयन आहे अशा दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Chitra Wagh
महाराष्ट्रानंतर गोवा, छत्तीसगड, राजस्थानमध्येही ऑपरेशन लोटस : चित्रा वाघ यांचा सूचक इशारा

शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्याला कल्पना आहे की, ज्या वेळी पूर परिस्थिती होती, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेले होते. पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या आणि त्या ठिकाणी पंचनामे झाले आणि अजूनही पंचनामे होत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना प्रत्यक्ष मदतही मिळणार आहे. उंटावरून शेळ्या हाकलण्याचं काम हे सरकार करत नाही, तर पूर परिस्थिती असताना कोणी पोचण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी पोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in