...अन् पालिकेतील कर्मचाऱ्यांना आठवला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’

चिल्लर नाणी मोजताना खामगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मार्च अखेरपर्यंत कर वसुली प्रत्येक नगरपालिकेत (Nagar Palika) सुरू आहे.
Nagar Palika Khamgaon
Nagar Palika KhamgaonSarkarnama

बुलडाणा : काही वर्षांपूर्वी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, नावाचा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. हे सांगण्याचे कारण म्हणजे बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेत त्या चित्रपटातील प्रसंग जसाच्या तसा घडला. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी जे केले, ते येथे एका चिप्स व्यावसायिकाने केले. त्यामुळे पालिकेतील (Nagar Palika) कर्मचाऱ्यांची मात्र चांगली तारांबळ उडाली.

चिल्लर नाणी मोजताना खामगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मार्च अखेरपर्यंत कर वसुली प्रत्येक नगरपालिकेत (Nagar Palika) सुरू आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता कर, (Tax) नळपट्टी कर आदी वसूल केला जातो. त्यासाठी नागरिकसुद्धा कर भरताना दिसत आहेत. असाच मालमत्ता करधारक खामगाव नगरपालिकेत कर भरण्यासाठी पोहोचला, तेव्हा कर विभागात एकाच गोंधळ उडाला. कारण खामगाव येथील जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे मालमत्ता कर 93 हजार 833 रुपये बाकी होता, तो कर भरण्यासाठी बोहरा 1, 2 व 5 रुपयांची नाणी अशी ५४ रुपयांची चिल्लर नाणी घेऊन नगरपालिकेत पोहोचले.

एवढी चिल्लर पाहून कर्मचारी अचंबित झाले आणि हे केव्हा मोजायचे असा प्रश्न त्यांना पडला. आजच्या परिस्थितीत व्यवहारात काही नाणी घेतली जात नाहीत. तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त 20 हजार रुपयांची नाणी स्वीकारली व बाकी रक्कम टप्या टप्प्याने भरण्याचे सुचविले. मात्र या घटनेवरून एका चित्रपटाची आठवण उपस्थितांना झाली.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याची प्रचिती खामगाव नगरपालिकेत आली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी २५ हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात भरायला घेऊन येतो आणि हे पैसे मोजत मोजता निवडणूक विभागातील अधिकारी अक्षरशः घामाने चिंब होतात. तोच फंडा एका चिप्स व्यावसायिकाने अमलात आणला. मालमत्ता कर भरा, असा तगादा त्याच्या मागे लावल्याने त्यांनी ४ कॅरेटमधून ५४ हजार रुपयांची चिल्लर नगर पालिकेच्या कर विभागात आणली. यामुळे कर विभागात तारांबळ उडाली. अखेर तांत्रिक कारणास्तव २० हजार रुपयांची चिल्लर स्वीकारून उरलेली रक्कम टप्याटप्प्याने भरण्याचे सांगण्यात आले.

Nagar Palika Khamgaon
आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसची यंग ब्रिगेड उतरणार रिंगणात...

मी काल इमारतीचा कर भरण्यासाठी तब्बल ५४ हजार रुपयांची नाणी नगर पालिकेत चार कॅरेटमधून नेली. पण पालिकेने भारतीय चलनात असलेली २० हजार रुपयांची नाणी स्वीकारली आणि उर्वरित परत केली. ही चिल्लर आम्हा व्यावसायिकांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कारण बॅंकसुद्धा चिल्लर नाणी स्वीकारत नाही. त्यामुळे यावर काय इलाज करावा, असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे.

- मनीष कल्याणदास बोहरा, चिप्स व्यावसायिक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com