...अन् रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांनी आमदार किशोर जोरगेवारांना बोलावून घेतले !

आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या काही प्रश्‍नांकरिता ते मुंबईला गेले होते. हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्याशी संबंधित होते.
MLA Kishor Jorgewar and Eknath Shinde
MLA Kishor Jorgewar and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : मुख्यमंत्री म्हटले तर, दिवसभराचा व्यस्त कार्यक्रम आलाच... त्यातही दुस-या दिवशी पुन्हा सक्काळपासून थकवणारा व्यस्त दौरा... अशातही राज्याचे मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत, तर कधी कधी पहाटेपर्यंत काम करतात, अशी चर्चा आजवर होती. मात्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मुख्यमंत्र्यांनी चक्क रात्री २ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांना भेटण्याची वेळ दिली. त्यामुळे या चर्चेतील सत्यांश जनतेपुढे आला आहे.

झाले असे की, आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या काही प्रश्‍नांकरिता ते मुंबईला गेले होते. हे काम मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या खात्याशी संबंधित होते. दिवसभर व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्री भेटू शकले नाही. पण काम तर महत्वाचे होते. त्यामुळे आमदार जोरगेवारांनी रात्री ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांना कामाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. पण रात्रीचे ११ वाजून गेले असल्यामुळे आता मुख्यमंत्री आराम करतील आणि भेटणार नाहीत, असा समज आमदार जोरगेवारांचा झाला. तरीही त्यांना आशा होती अन् झालेही तसेच.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमदार जोरगेवार यांचा विषय पोचताच त्यांनी रात्री दोन वाजताच्या सुमारास आमदार किशोर जोरगेवार यांना मुंबई (Mumbai) येथील वर्षा बंगल्यावर बोलावले. तेथे आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला. हा विषय तत्काळ मार्गी लागला नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळे येणार होते. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हा विषय मार्गी लावला. यानंतर जवळपास १५ मिनिटं मतदार संघांतील विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली.

MLA Kishor Jorgewar and Eknath Shinde
अजित दादा म्हणाले, आमदार किशोर जोरगेवार यांची ‘ती’ मागणी योग्यच !

मुख्यमंत्री उत्साही..

मध्यरात्रीची वेळ असतानाही मुख्यमंत्र्यांच्या चेह-यावर थकवा नव्हता, ते उत्साही दिसत होते. असे जोरगेवार यांनी या भेटीनंतर ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. मी सांगितलेले अनेक विषय प्राथमिकतेने सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्‍वासन दिले आहे. या प्रकारानंतर संवेदनशील आणि 24 तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com