Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

गुवाहाटीत शिंदे गटाची आज दुपारी महत्वाची बैठक; प्रवक्त्याची निवड होणार...

शिवसेना (Shivsena) कुणाची, हा वाद विधानसभेत पोहोचला आहे. त्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट (Eknath Shinde) दोघांकडूनही कायदेशीर सल्ला घेतला जातोय.

नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात लढाई सुरू झाली आहे. आता ही लढाई विधानसभा आणि न्यायालयाच्या कायदेशीर बाबींपर्यंत येऊन पोहोचली आहे. आपल्या गटाच्या हालचाली आणि इत्थंभूत माहिती प्रसार माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज गटाच्या प्रवक्त्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी दुपारी २ वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना कुणाची, हा वाद विधानसभेत पोहोचला आहे. त्यासाठी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde) गट दोघांकडूनही कायदेशीर सल्ला घेतला जातोय. झिरवळांनी (Narhari Zirwal) घेतलेले निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे का, याचीही चाचपणी केली जात आहे. कारण त्या १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणाऱ्यांपैकी ७ आमदार पुन्हा फुटले. त्यामुळे कालपासून कायदेशीर बाबींवर जोर दिला जात आहे.

प्रवक्त्याच्या निवडीसोबतच पुढील रणनीतीवरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सोबतच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याशीही चर्चा होणार आहे. पक्ष कोणता ते अद्याप शिंदे गटाने स्पष्ट केलेले नाही. शिंदेंचं पुढचं पाऊल कोणतं असणार, महाविकासमधून बाहेर पडून पाठिंबा कुणाला देणार, हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. बंडखोर आमदारांची भूमिका काय? ते कुणाशी चर्चा करतात? आपली भूमिका तर त्यांनी लपवली नाही ना, यावरही चर्चा होणार आहे. सत्तास्थापनेत आपला वाटा किती यावरही चर्चा होणार असल्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे. काल फार काही घडामोडी झाल्या नाहीत. आज अजून एक आमदार गुवाहाटीत येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

फायरब्रॅंड प्रवक्त्याची निवड..

आमदारांची अस्वस्थता वाढू नये, यासाठी प्रयत्न गेले जाणार आहेत. कारण विधान परिषद निवडणुकीपासून ते बाहेरच आहेत, मतदारसंघात गेलेले नाहीत. शिंदे गटाने आधी प्रतोद, मग गटनेते निवड केली आणि आज प्रवक्त्याची निवड होणार आहे. बंडखोर आमदारांचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी परतीचे दोर कापले गेले आहेत, हे शिंदेंना एव्हाना कळून चुकले आहे. शिवसेनेकडे संजय राऊत हे तडफदार प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडूनही फायरब्रॅंड प्रवक्ता निवडला जाणार आहे. फायरब्रॅंड प्रवक्ते देण्याचा निर्णय आज दुपारी होईल.

राजकीय पक्ष चालवण्याची तयारी..

राजकीय पक्ष चालवण्याची ही तयारी आहे. हा गट खरी शिवसेना आहे, हे वारंवार सांगण्यात येत आहे. हिंदुत्वासाठी आणि सेनेच्या अस्तित्वासाठी ही लढाई आहे. कारण कॉंग्रेस राष्ट्रवादी रोज सेनेला संपवत असा बंडखोर आमदारांचा आरोप आहे. ४ दिवसांत नवी सरकार बनणार, संयम ठेवा, असा विश्‍वास शिंदेंनी आपल्या आमदारांना दिला आहे. आपलेच सरकार येईल, असे ते सातत्याने आमदारांना सांगत आहेत.

Eknath Shinde
बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचे आमदार जोरगेवारांनी सांगितले ‘हे’ कारण...

सोमवारपासून सुनावणी..

१६ आमदारांच्या निलंबनावर सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. सुनावणीला आमदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ही मागणी केली आहे. उपाध्यक्ष आमदारांना नोटीस पाठवतील, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासून महत्वपूर्ण घडामोडी होतील असं दिसतंय. आता आमदार चिमनआबा पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजय रायमुलकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांना नोटीस देण्याची विनंती अरविंद सावंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना केली आहे. कमळाबाईकडे गेले तर भगव्याला कायमचे मुकाल, असा इशारा सावंत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

आज, उद्या हा गट फुटणार..

आज ना उद्या हाही गट फुटणार आहे. मग ते आमदार अपात्र होतील. यांना भाजपशिवाय पर्याय राहणार नाही. भाजपला हेच हवे आहे. आमदार खूष नाहीत. आजही मला त्यांचे फोन येतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. २०१४ मध्ये त्यांनी १४ युती तोडली होती आणि २०१९ मध्ये वचन वचन तोडून धोका दिला होता. मातोश्रीला तुम्ही मंदिर म्हणता, मग मातोश्रीचीच प्रतारणा कशी करता, वेडेवाकडे भाष्य कसे करता, असा सवाल ठाकरेंनी बंडखोरांना केला आहे. राष्ट्रवादी त्रास देते, असे ते आता सांगत आहेत. मग तेव्हाच सांगितले का नाही, त्यांना तोंडावर बोललो असतो, तुम्हाला पाहिजे तर एक घाव दोन तुकडे केले असते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com