Nitin Gadkari : अमृत सरोवर योजनेतून देशभरात ७५ हजार तलाव, शेततळी, नाला खोलीकरण करणार..

या माध्यमातून आपण देशातील ज्या राज्यात, जिल्ह्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तिथे तब्बल ७५ हजार तलाव, विहीरी, नाल्याचे खोलीकरण, शेत तळी अशी कामे करणार आहोत. (Nitin Gadkari)
Nitin Gadkari : अमृत सरोवर योजनेतून देशभरात ७५ हजार तलाव, शेततळी, नाला खोलीकरण करणार..
Union Minister Nitin Gadkari Latest Marathi NewsSarkarnama

अकोला : देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्याचे उत्पन्न अडीचपट झाले पाहिजे हा दृष्टीकोन समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमृत सरोवर ही योजना सुरू केली आहे. या माध्यमातून देशभरात ७५ हजार तलाव, शेततळी, नाला खोलीकरणासह पाच प्रकारची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे जलसंवर्धनाचे काम वाढेल आणि सिंचनाची क्षमता वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

अकोला येथील पंजाबरा कृषी विद्यापीठात अमृत सरोवर योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३४ तलावंची माहिती आणि प्रयोगित तत्वावर बांधण्यात आलेल्या तलावाचे फायदे या संदर्भात गडकरी यांनी यावेळी माहिती दिली. राज्याचे कृषी राज्यमंत्री दादा भुसे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. (Vidharbha)

अमृत सरोवर योजनेबद्दल माहिती देतांना गडकरी म्हणाले, देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही पाणी आहे. मुबलक पाणी असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील थांबतील. त्यामुळे पळणाऱ्या पाण्याला, चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमीनीला प्यायला लावा. शेतातले पाणी शेतात आणि घरातले पाणी घरात आडवा, या धोरणाने आपण काम करत आहोत.

अमृत सरोवर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या माध्यमातून आपण देशातील ज्या राज्यात, जिल्ह्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तिथे तब्बल ७५ हजार तलाव, विहीरी, नाल्याचे खोलीकरण, शेत तळी अशी कामे करणार आहोत. यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून फक्त जिथे हा प्रकल्प राबवला जाईल तिथली माती आणि मुरुम वापरात घेण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

Union Minister Nitin Gadkari Latest Marathi News
Imtiaz jalil : पालकमंत्री साहेब, औरंगाबाद आमचा बालेकिल्ला म्हणता ना, मग शहरासाठी काय केलं ?

फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांना या संदर्भात एक जीआर काढला होता. अकोला जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेत केलेल्या तलावातील पाण्यामुळे येथील विहिरीतील पाण्याचे प्रमाण वाढले, बराच भाग सिंचना खाली आला. ज्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.

या प्रकल्पासाठी पैसा लागणार नाही, कारण राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने हे काम करुन देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. अमृत सरोवर प्रकल्पासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मुरुम आणि माती वापरण्याची परवानगी दिली तर उन्हाळ्यामध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई कमी करता येईल, असा दावा देखील गडकरी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in