अमृता फडणवीसांनी विचारले, आज वसुली चालू है या बंद?

महाविकास आघाडीचे सर्व नेते आज आंदोलनात व्यस्त असतील, असे गृहीत धरून अमृता फडणवीस Amruta Fadanvis यांनी ‘आज वसुली चालू है या बंद?’, असे ट्विट केले.
अमृता फडणवीसांनी विचारले, आज वसुली चालू है या बंद?
Amruta FadanvisSarkarnama

नागपूर : लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या मोटारीच्या ताफ्याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. तिन्ही पक्षांचे नेते आज राज्याच्या विविध भागांत आंदोलनाच व्यस्त होते. त्यामुळे डिवचण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘आज वसुली चालू है या बंद?’, असे ट्विट केले.

राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासूनच तीन चाकांचा ऑटो, महाभकास आघाडी, महावसुली सरकार, असा उल्लेख विरोधी पक्ष भाजपकडून केला जातो. महाविकास आघाडीचे सर्व नेते आज आंदोलनात व्यस्त असतील, असे गृहीत धरून अमृता फडणवीस यांनी ‘आज वसुली चालू है या बंद?’, असे ट्विट केले. त्यानंतर रायभर विविध चर्चांना उधाण आले. त्यांच्या ट्विटवर पटापट प्रतिक्रिया उमटू लागल्या. सरकारवर असे ताशेरे ओढल्यावर गप्प बसतील, तर त्या रुपाली चाकणकर कशा? मग त्यांनी त्यावर ‘वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे प्रत्युत्तर दिले. त्यांनंतर दोन्ही बाजुंनी प्रतिक्रिया उमटायला लागल्या.

अमृता फडणवीस यांचे ट्विट असो किंवा गाणे, दोन्ही चांगलेच गाजत असतात. सोशल मिडियावर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतो. ‘अमृताचा वेलू गेला तरबूजावरी, गाणे म्हणा २५ वर्ष घरच्या घरी.. महाविकास आघाडी.. मोगरा फुलला’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या तेथेच रुपाली ताई आज संगीताच्या तज्ञ बनल्या आहे, अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या. रुपाली चाकणकर यांची बाजू घेताना काही लोक म्हणतात की, फडणवीसांमध्ये दम असेल, तर त्यांनी उत्तर प्रदेश बंद करून दाखवावा. तर चाकणकरांनी सल्ला देताना ‘ताई तुम्ही कशाला मनावर घेता, वहिनी बॅंकेत आहेत. बॅंकेच्या वसुलीबद्दल त्या बोलत असतील कदाचित. उगीच स्वतःला लावून घेतलं तुम्ही.’ चाकणकरांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे वहिनींनी मारलेला टोला अचूक लागला, असेही ट्विट आले आहे.

Amruta Fadanvis
या नराधमांना सार्वजनिकरित्या फाशी द्यावी! अमृता फडणवीस भडकल्या

एकंदरीतच अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्यानंतर त्याला चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर ट्विटरवर दोन्ही बाजूंनी भरपूर प्रतिक्रिया आल्या. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दिवसभर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या क्रिया आणि त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया यांनीच आजचा दिवस गाजला. महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पडलेल्या सीबीआयच्या छाप्याचीही फारशी चर्चा झाली नाही. मात्र ट्विटरवर आज गाजली ती अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांच्या ट्विट-रिट्विटची जुगलबंदी.

Related Stories

No stories found.