अमरावती हिंसाचार हा पूर्वनियोजित, त्या मोर्चाची चौकशी करा- फडणवीस

त्रिपुरात ज्या घटना घडल्या नाहीत त्याचे फेक फोटो व्हायरल केले गेले
अमरावती हिंसाचार हा पूर्वनियोजित, त्या मोर्चाची चौकशी करा- फडणवीस
Devendra Fadanvis

अमरावती : अमरावतीत (Amaravati) घडलेला हिंसाचार (Voilence) हा नियोजित कट होता, त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाही, त्याच्या खोट्या न्यूजच्या सोशल मिडीयात व्हायरल केल्या गेल्या. फेक न्यूजच्या आधारावर राज्यभरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हे इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि हिंसाचार झाला, हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भुमिका स्पष्ट केली. तसेच या हिंसाचाराचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Devendra Fadanvis
राज्य सरकारने विदेशी मद्यावरील शुल्क केला निम्म्याने कमी

''त्रिपुरात ज्या घटना घडल्या नाहीत त्याचे फेक फोटो व्हायरल केले गेले. मशिद, कुराण जाळण्यात आल्याच्या खोट्या न्यूजच्या आधारावर एका विशिष्ट समाजाला बहकवण्यात आले. त्यानंतर या फेक न्युजच्या आधारावर एकाच दिवशी राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतातच कसे, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. यावरुनच हे सर्व पूर्वनियोजित होते, लोकांना बहकवून त्यांना दंगे भडकवायचे होते, असेच दिसुन येते, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

''१३ तारखेला जी घटना घडली ती १२ तारखेच्या हिंसाचाराची रिअॅक्शन होती, १२ तारखेची घटना पुर्णपणे डिलीट करुन १३ तारखेला घडलेल्या हिंसाचारावर पोलीस कारवाई करत आहेत. १३ तारखेच्या घटनेवर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे आमचे अमरावती जिल्ह्यातील सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांनी १२ तारखेच्या हिंसाचारावरही कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातय. दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर एकतर्फी कारवाई सुरु आहे. भाजपा कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. पण राज्यभरात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मार्चाचे आयोजन कोणी केले होते, याचाही तपास व्हायला हवा, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in