आघाडी सरकारचं दंगली घडवून आणतयं ; भाजपचा गंभीर आरोप

महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi government) सरकार तीन-तीन ठिकाणी दंगल घडवून आणत आहे. त्यामुळे पोलिसांनी संयम राखावं. आम्ही शांततेचं आवाहन करतोय''
anil bonde
anil bondesarkarnama

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने मोर्च निघाले. काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागले. अमरावती येथे आज भाजपने बंदची हाक दिली होती. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. यावर भाजपचे नेते, माजी आमदार अनिल बोंडे (anil bonde) यांनी टि्वट करीत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अनिल बोंडे म्हणाले, ''आज अमरावती संपूर्ण दुकानं बंद आहे. उस्फुर्तपणे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. तरुण बाहेर आलेला आहे. लोकं शांतपणे आंदोलन करतायत, तर पोलिस लाठ्या उगारत आहे. ही मोघलाई चालू देणार नाही. महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi government) सरकार तीन-तीन ठिकाणी दंगल घडवून आणत आहे. त्यामुळे पोलिसांनी संयम राखावं. आम्ही शांततेचं आवाहन करतोय''

''काल अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलिस कुठे होते, पोलिस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही,'' असे अनिल बोंडे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

त्रिपुरात जे घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. अमरावतीत शांतता राखण्यासाठी भाजपने बंदचे आवाहन केले होते. नागरिकांनी बंदला पाठिंबाही दिला, पण आंदोलकांचा उद्रेक झाला, मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला, आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.

anil bonde
STसंप मिटवण्यासाठी पवार-परब यांच्यात निर्णायक चर्चा

''त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी,'' असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी आपली भुमिका मांडली आहे. यासोबत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरेही ओढले आहेत. अमरावतीत होणारा हिंसाचार थांबण्यात सरकारला अपयश येत आहे का असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com