अमरावती हिंसाचार : शिवसेना जिल्हा व शहरप्रमुखांना अटक

अमरावती बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता.
अमरावती हिंसाचार : शिवसेना जिल्हा व शहरप्रमुखांना अटक
Amravati Curfew Sarkarnama

अमरावती : अमरावती (Amravati) शहरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी (Police) मोठी कारवाई केली आहे. 13 तारखेच्या अमरावती बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता. त्याच वेळी शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख राजेश वानखडे आणि महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह काही काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.

Amravati Curfew
ठाकरे सरकारबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट ; म्हणाले..

या बंदावेळी प्रचंड घोषणाबाजी व नारेबाजी व चिथावणीखोर भाषणे सुद्धा केली गेली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे आणि महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे. यावरून या दंगलीत शिवसेनेचाही सहभाग होता हे आता स्पष्ट झाले आहे. दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलिस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा पोलिसांवर सातत्याने आरोप होत होता.

Amravati Curfew
निवृत्ती आठवड्यावर आली अन् मुख्य सचिव कुंटेंना मुदतवाढ मिळाली

दरम्यान, अमरावतीत घडलेला हिंसाचार हा नियोजित कट होता, त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाही, त्याच्या खोट्या न्यूजच्या सोशल मिडीयात व्हायरल केल्या गेल्या. फेक न्यूजच्या आधारावर राज्यभरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हे इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि हिंसाचार झाला, हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या हिंसाचारा प्रकरणी भाजप नेत्यांनाही अटक झाली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in