Amravati : अमरावती ‘पदवीधर’ निवडणूक: भाजपची तयारी जोरात, कॉंग्रेस स्वबळावर...

अमरावती (Amravati) पदवीधर निवडणुकीत जास्त उमेदवार राहणार नाही, असे सध्यातरी दिसते. लढत भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्येच (Congress) होईल, असे आजचे चित्र आहे.
Amravati Graduate Election
Amravati Graduate ElectionSarkarnama

नागपूर : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या (Amravati Graduate Constituency Election) निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेसोबत इच्छुकांचे कार्यकर्ते मतदार नोंदणीवर भर देत आहे. भाजप ४ महिन्यांपूर्वीच ॲक्टीव झाली आहे. कॉंग्रेसने उशिरा तयारी सुरू केली असली तरी आजस्थितीत भक्कम यंत्रणा उभी केली आहे. यापूर्वी कॉंग्रेस बी.टी. देशमुख यांना पाठिंबा देत आली आहे. आता आपला उमेदवार उभा करून स्वबळावर लढण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. संभाजी ब्रिगेडनेही आपला उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

अमरावती (Amravati) पदवीधर निवडणुकीत जास्त उमेदवार राहणार नाही, असे सध्यातरी दिसते. लढत भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्येच (Congress) होईल, असे आजचे चित्र आहे. मतदारांचा आकडा आला नसला तरी अंदाजे दोन ते सव्वादोन लाख मतदार असतील, असा अंदाज आहे. कॉंग्रेसने समन्वय समिती गठित केली आहे. माजी महापौर मिलींद चिमोटे यांची या समितीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने माजी सदस्य प्रा. बी. टी देशमुख यांना पाठिंबा दिला होता. यावेळी प्रथमच काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निश्चित झाला नसला तरी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची तयारी या पक्षाने केली आहे.

या निवडणुकीसाठी माजी पालकमंत्री आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर, (Yashomati Thakur) माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यांच्या नेतृत्वात समन्वय समिती गठित करून माजी महापौर मिलिंद चिमोटे यांना मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहर काँग्रेस कार्यकारिणीची सभा नुकतीच पार पडली. अमरावती पदवीधर मतदार संघातील विद्यमान सदस्य पदवीधर, बेरोजगार व आनुषंगिक घटकांचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा सुर या बैठकीत उमटला. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी पदवीधर मतदारसंघात विजय मिळवण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीने पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे नियोजन करण्यात आले. याकरिता एक पूर्ण वेळ कक्षसुद्धा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थापन करण्यात आला आहे.

Amravati Graduate Election
`पदविधर` निवडणुकीत विखे- थोरातांची पारंपारीक लढत?

संभाजी ब्रिगेडही मैदानात..

संभाजी ब्रिगेड अमरावती पदवीधर मतदार संघाची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे, पदवीधर मतदार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. गोपाल वांडे, तालुका अध्यक्ष महेश देवळे आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडची बांधणी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मजबूत झाली आहे. तरी पाचही जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना मत नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे. व संभाजी ब्रिगेड लवकरच पदवीधरांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार घोषित करणार आहे, असे गजानन भोयर यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात प्रसिद्ध असलेले संभाजी ब्रिगेडचे पदवीधर विभागीय अध्यक्ष प्रा. गोपाल वांडे यांनी संभाजी ब्रिगेड अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com