Amravati Loksabha : नवनीत राणांसमोर सध्यातरी नसणार कुणाचेच आव्हान, कारण महाविकास आघाडीचे ठरलेच नाही !

Navnit Rana : नवनीत राणा सर्वाधिक चर्चेच राहणाऱ्या खासदार आहेत.
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

MP Navnit Rana News : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी २०२४ मध्ये होऊ घातली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांची थोडीफार तयारी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने खूप आधीपासून तयारी सुरू केलेली आहे. मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप झालेले असून नेत्यांचे दौरेही झाले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा खासदार आहेत. येथे अद्याप महाविकास आघाडीचे काहीच ठरलेले नाही. (Nothing has been decided by Mahavikas Aghadi yet)

नवनीत राणा सर्वाधिक चर्चेच राहणाऱ्या खासदार आहेत. मतदारसंघात त्या सातत्याने दौरे करत असतात. त्यांची दिवाळी दरवर्षी मेळघाटात साजरी करतात. २०२४च्या निवडणुकीसाठी त्या सज्ज आहेत. गेल्या काही काळापासून नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेऱ्याचे आमदार रवी राणा भाजपमय झालेले आहेत. भाजपहिताची बरीच आंदोलने त्यांनी केलेली आहे. त्यांपैकी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरील ‘हनुमान चालिसा पठण’, हे त्यांचे आंदोलन चांगलेच गाजले. भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचा त्यांना आशीर्वाद आहे, असे सांगितले जाते.

पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत राणा भाजपच्याच उमेदवार असतील. तसे नाही झाले तर त्या भाजप पुरस्कृत उमेदवार नक्कीच असतील, असे गेल्या काही वर्षांतील घडामोडींवरून लक्षात येते. सद्यःस्थिती पाहता त्यांच्यासमोर कुणाचेच आव्हान नाही आणि त्यांचा रस्ता मोकळा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण महाविकास आघाडीकडून अद्यापही कुणाचे नाव पुढे आलेले नाही. महाविकास आघाडीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार, हेसुद्धा सांगता येत नाही. कारण अद्याप तशी चर्चाही सुरू झालेली नाही.

इच्छुक उमेदवार मतदारसंघाचे दौरे सुरू करत असतो. पण महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एकाही पक्षाचा एकही नेता मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुष्टीने फिरतोय, असे ऐकिवात नाही आणि पक्षस्तरावरही कुणाला पुढे करण्यात आलेले नाही. अमरावतीमधून लढू शकणारे नेते आनंदराव अडसूळ उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात गेले. मागील निवडणुकीनंतर त्यांनी मतदारसंघाकडे फिरकूनही पाहिलेले नाही. त्यामुळे यावेळी ते येथून लढणार नाही, असे सांगितले जात आहे. हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे राजकीय पक्षांना उमेदवार निवडतानाच कौशल्य दाखवावे लागणार आहे.

Navnit Rana
Chandrapur Loksabha : तेव्हा ‘दारू विरुद्ध दूध’च्या मुकाबल्यात दारूचा झाला होता विजय, पण आता...

लोकसभा निवडणुकीची चर्चाच अद्याप सुरू नाही झाली. अमरावतीची जागा महाविकास आघाडी म्हणूनच लढावी लागणार आहे. सोबत लढायचे, असे आमचे ठरले आहे. त्यामध्ये ही जागा आम्ही कॉंग्रेससाठी मागणार आहोत. पूर्वीसुद्धा ही कॉंग्रेसचीच जागा होती. सद्यःस्थिती पाहता कॉंग्रेसनेच येथून लढावे, असे जनमत आहे, असे कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. लढायचे झाल्यास उमेदवार कोण, यावर ते म्हणाले की, आधी महाविकास आघाडीमध्ये ही जागा आम्हाला पदरात पाडून घ्यावी लागेल. त्यानंतर उमेदवाराबद्दल काही ठरवता येईल. थोडक्यात काय तर भाजप आणि नवनीत राणा यांची तयारी सुरू झाली असताना महाविकास आघाडीचं अजून ठरलंच नाही.

Navnit Rana
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

अमरावती मध्ये शिंदे गटाचा मोठा म्हणावा असा कुणी नेता नाही. येथे उद्धव ठाकरेंचे सैनिक मोठ्या संख्येने आहेत आणि ते महाविकास आघाडीत आहेत. येथून ठाकरे गटाचा उमेदवार असू शकतो. पण कॉंग्रेसने येथे मागणी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका काय, हे अद्याप कळू शकले नाही. महाविकास आघाडीचे काही ठरेपर्यंत भाजप आणि नवनीत राणा तयारीमध्ये खूप पुढे निघून जाणार आहेत. वेळेपर्यंत उमेदवार द्यायचा नाही, ही कॉग्रेसची (Congress) आणि थोडीफार राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही पद्धत आहे. यावेळी दोन्ही पक्षांना पद्धत बदलावी लागणार आहे. तेव्हा कुठे भाजपला टक्कर देता येईल.

Navnit Rana
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गट राजेंद्र गवई यांनी २०१९च्या निवडणुकीत नवनीत राणा (Navnit Rana) यांना साथ दिली होती. यावेळी ते काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यांचे काही खरे नाही, यावेळी गवई स्वतःदेखील उभे राहू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. पण रिपाइंच्या (RPI) नेत्यांचे वेगवेगळे गट आहेत. प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, (Prakash Ambedkar) रामदास आठवले वेगवेगळे झालेले आहेत. त्यामुळे गवईंच्या विजयाची खात्री जरी नसली, तरी निकालावर परिणाम ते करू शकतात, ही एक बाब आणि भाजपने (BJP) नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील काही नेते नाराज होण्याची शक्यता, या दोन बाबी नवनीत राणांचा संघर्ष वाढवू शकतात.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com