
Amravati DCC Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. दिडशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असताना नऊशे कोटीची गुंतवणूक केली, त्यामुळे बँक वादात सापडली असल्याचे आरोप बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले आहेत.
२०१७-२० या आर्थिक वर्षात बँकेने म्युच्युअल फंडात जवळपास अकराशे कोटीची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक थेट म्हणजेच कोणत्याही एजंटशिवाय करण्याचा ठराव झाला होता. या वर्षांमध्ये पाच एजंट बँकेमार्फत काम पाहत होते. त्या एजंटला एकत्रित ३४२ कोटी रुपयांचे कमिशनही देण्यात आले, ते कमिशन कोणाला मिळाले याची चौकशी झाली पाहिजे, असं बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
बच्चू कडू अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बॅंकेत सुरु असलेल्या चुकीच्या कारभाराचा पाढा वाचत काही मोठे आरोपही त्यांनी केले आहेत. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला जो स्टे मिळाला आहे. त्यामध्ये न्यायालयाने चौकशी थांबवल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. तसेच, चुकीची माहिती देऊन बँकेने न्यायालयाचीच दिशाभूल केली असली तरी नियमाप्रमाणे बँकेवर नियमाप्रमाणे कारवाई थांबवता येणार नाही, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू यांनी हे आरोप करताना कोणाची नावे घेतली नसली तरी यावरुन अमरावतीत राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोहबर २०२१ मध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत तत्कालीन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत बच्चू कडू यांना 22 मतं मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मतं मिळाली. बच्चू कडू 3 मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेत काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय खोडके आणि बच्चू कडू यांच्यासह इतर नेत्यांनी ताकद पणाला लावली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.