Amravati Graduate Election Result : लिंगाडेंची विजयाकडे वाटचाल, घेतली निर्णायक आघाडी!

Dheeraj Lingade : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागणार?
Dheeraj Lingade  : Ranjeet Patil
Dheeraj Lingade : Ranjeet Patil Sarkarnama

Amravati Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आता मतमोजणी पार पडत आहे. कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीनंतर लिंगाडे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपचे रणजीत पाटील यांचे गोटात खळबळ माजली आहे.

Dheeraj Lingade  : Ranjeet Patil
Amravati News: रणजीत पाटलांचा वारू लिंगाडे रोखणार का? मतमोजणीस प्रारंभ...

अमरावती (Amravti) विभाग पदवीधर मतमोजणी होत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर आहेत.

Dheeraj Lingade  : Ranjeet Patil
Marathwada Teacher Constituency Result : राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंची विजयासाठी झुंज

भाजपचे रणजित पाटील यांना 21971 मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 23417 मते आहेत. दोघांच्या मतातील फरक जवळपास 1600 मतांचा आहे. मतांच्या फरकावरून समजते की, लिंगाडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com