Amravati Graduate Result : दुसऱ्या फेरीत लिंगाडेंची आघाडी : रणजीत पाटलांचे टेन्शन वाढले!

Amravati Graduate Result : फडणवीस निकटवर्तीय ऱणजीत पाटील पिछाडीवर..
Amravati Graduate Result : Dheeraj Lingade : Ranjeet Patil
Amravati Graduate Result : Dheeraj Lingade : Ranjeet PatilSarkarnama

Amravati Graduate Result : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आता मतमोजणी पार पडत आहे. कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये काटे की लढत होताना दिसत आहे. आता दुसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीतही लिंगाडे आघाडीवर असल्याने आता भाजपचे रणजीत पाटील यांचे गोटात खळबळ माजली आहे.

Amravati Graduate Result : Dheeraj Lingade : Ranjeet Patil
Amravati News: रणजीत पाटलांचा वारू लिंगाडे रोखणार का? मतमोजणीस प्रारंभ...

अमरावती (Amravti) विभाग पदवीधर मतमोजणी होत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी दरम्यान ही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर आहेत. तीन वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता.

भाजपचे रणजित पाटील यांना 11312 मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 11992 मते आहेत. दोघांच्या मतातील फरक 680 एवढा आहे. मतांच्या फरकावरून दोघांमध्ये अतितटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Amravati Graduate Result : Dheeraj Lingade : Ranjeet Patil
MVA News: सुधाकर अडबाले विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपसाठी धोक्याची घंटा?

रणजीत पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाता. ते मागील दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. पाटील यांचे पिछाडीवर जाणे, हा भाजपसाठी फार मोठा धक्का असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in