Amravati Graduate Election : भाजपला नागपूरप्रमाणे अमरावतीतही गटबाजी भोवली !

BJP News : हा पराभव भाजप नेत्यांना विचार करायला लावणारा आहे.
Ranjeet Patil and Dhiraj Lingade
Ranjeet Patil and Dhiraj LingadeSarkarnama

Graduate Election News : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये सरळ सरळ दोन गट पडले होते. त्यामुळे येथे नागोराव गाणार यांचा पराभव झाला आणि सुधाकर अडबाले यांनी दमदार विजय मिळविला. अमरावती (Amravati) विभागातही भाजपला गटबाजी भोवली आणि दोन वेळा आमदार राहिलेले डॉ. रणजीत पाटील यांना महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धीरज लिंगाडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

या निकालासाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३० तास प्रतीक्षा करावी लागली. लिंगाडे हे एक ते दीड हजार मतांच्या फरकाने समोर चालत होते. त्यामुळे काल रात्रीपर्यंतही निश्‍चित असे काहीही सांगता येत नव्हते. पण लिंगाडेच विजयी होतील, असा विश्‍वास आज तयार झाला होता आणि तो सार्थही ठरला. धीरज लिंगाडेंच्या विजयाची जेवढी चर्चा सुरू आहे, तेवढीच रणजीत पाटलांच्या पराभवाचीही आहे. त्यांच्या पराभवाची कारणे जाणून घेणे महत्वाचे ठरते. कारण हा पराभव भाजप नेत्यांना विचार करायला लावणारा आहे.

डॉ. रणजीत पाटील तसे सज्जन पुरुष. पण विभागातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अमरावती आणि या जिल्ह्याकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यांच्या पराभवामागील हे एक मोठे कारण आहे. वरून दिसत नसली तरी भाजपमध्ये गटबाजी आहे. रणजीत पाटलांचे भाजपमधील एका मोठ्या गटासोबत (अकोला) पटत नाही. या गटाचे नेते भाजपमधील मोठे प्रस्थ आहे. त्या गटासोबत जुळवून न घेणे, याचा फटका त्यांना बसला. पाटलांचा विरोधी गट केवळ तटस्थ राहिला असे नाही, तर त्या गटाने पाटलांच्या विरोधात काम केले. त्याशिवाय लिंगाडेंचा विजय शक्य नव्हता.

Ranjeet Patil and Dhiraj Lingade
Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

नुटाने घेतला बी.टी. देशमुखांचा बदला..

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे ३० नेतृत्व केलेले प्रा. बी.टी. देशमुख याचा पराभव डॉ. रणजीत पाटील यांनी केला होता. तेव्हापासूनच नुटा संघटना (नागपूर युनिव्हरसीटी टीचर्स असोसिएशन) या पराभवाचा वचपा काढण्याची संधी शोधत होती. रणजीत पाटलांवरील नाराजी आणि भाजपमधील गटबाजीने यावेळी नुटाला ती संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. नुटाने आपली सर्व ताकत लिंगाडेंच्या मागे उभी केली. नुटाची ताकद मोठी आहे, हेसुद्धा त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिले आणि परवा परवा पर्यंत माहिती नसलेले धीरज लिंगाडे निवडून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com