Aarti Singh : राणांच्या राड्यावर आरती सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

Aarti Singh : अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग (Cp Aarti Singh) यांच्यावर राणा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Navneet Rana, Aarti Singh
Navneet Rana, Aarti Singhsarkarnama

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचं अपहरण करून या प्रकरणाचा लव्ह जिहादचा (Love Jihad) संबंध असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) , भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता.

त्यानंतर या प्रकरणावर नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यात राडा घातला. अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग (Cp Aarti Singh) यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर पहिल्यांदाच अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.

मला या संदर्भात अनेक निवेदन व तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या.तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आरती सिंग यांनी सांगितलं आहे.

विधी अधिकारी त्यांच्याशी चर्चा करून पुढची कारवाई करू असंही अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध केव्हा गुन्हे दाखल होणार की कायदा सर्वसामान्यांसाठीच असतो हा ही सवाल सर्वसामान्य कडून विचारला जातोय, असे सिंग यांनी सांगितले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कॉल रेकॉर्डिंग वरून पोलिसांची हुज्जत घालून राडा केला, त्यांनतर नवनीत राणा विरोधात अमरावतीत अनेक संघटनांनी नवनीत राणाविरुद्ध गुन्हे दाखल व्हाव्या यासाठी अनेक संघटनांना आंदोलन करीत आहेत.

Navneet Rana, Aarti Singh
Hanumant Sathe : दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली.

नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते. रागाच्‍या भरात घरातून निघून गेलेल्या युवतीच्या प्रकरणाला ‘लव्‍ह-जिहाद’चे वळण देऊन; समाजात तेढ निर्माण करणे, यासह पोलिसांचा सातत्याने अपमान करणे, हा प्रकार खासदारांना शोभत नाही. त्यांच्या विरोधात योग्य अशी कारवाई व्हावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in