Amravati Gram Panchayat Election : २५७ सरपंचपदासाठी तब्बल १२७९ उमेदवार देताहेत झुंज…

public campaign : जाहीर प्रचार करताना वैयक्तिक भेटींवर उमेदवार भर देताना दिसत आहेत.
Amravati Election
Amravati ElectionSarkarnama

Amravati Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता जोमात असून प्रचारासाठी उमेदवारांना अवघा दीड दिवस शिल्लक राहिला आहे. आज आणि उद्या १६ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजतापासून जाहीर प्रचार बंद होणार आहे. रविवारी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होणार असून सरपंचपदासाठी (Sarpanch) १२७९ तर सदस्य पदासाठी ४७९६ उमेदवार रिंगणात आहेत.

जाहीर प्रचार करताना वैयक्तिक भेटींवर उमेदवार भर देताना दिसत आहेत. निवडणूक (Election) असलेल्या गावांमध्ये रोजच्या जेवणावळी उठत आहेत. जेवणाऱ्यांची संख्या कुणाकडे जास्त आहे, याची आकडेमोड केली जात आहे. तळीरामांसाठीही रोजच्या रोज व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी सायंकाळी कामावरून आलेले लोक थेट ‘व्यवस्थेकडे’ धाव घेताना दिसतात. येवढे करूनही मतदार राजा संतुष्ट दिसत नाही, तर त्यांच्या डिमांड वाढत आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व ४१३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. १४ तालुक्यांतील २ हजार ९७ पदांसाठी ४ हजार ७९६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे २५७ सरपंचपदासाठी तब्बल १२७९ उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.

अपक्ष, बंडखोरांनी आणला तोंडाला फेस..

नामांकन माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले मोबाईल स्विच ऑफ ठेवून प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने अनेक नाराजांनी स्वतंत्रपणे सरपंच आणि सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मात्र त्यांची समजूत काढताना वरिष्ठ नेतेमंडळींची चांगलीच दमछाक झाली.

Amravati Election
GramPanchayat Election 2022 : कशी होते ग्रामपंचायत निवडणूक? एकदा वाचाच....

ऐनवेळी होणार गेम..

अनेक अपक्ष तसेच बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी गावातील सोयीचे राजकारण पाहता ऐनवेळी आपल्याच उमेदवाराला बंडखोरांकडून मदत कशी होईल, याची चाचपणी नेतेमंडळी करीत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी राजकीय परिस्थिती पाहून कुणाचा गेम होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com