Amravati APMC Election : यशोमतींचे वर्चस्व, औपचारिकताच ठरली सभापती-उपसभापतीची निवडणूक !

Yashomati Thakur : अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड पुन्हा सिद्ध झाली.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama

Yashomati Thakur Won Amravati APMC : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांची अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड पुन्हा सिद्ध झाली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. (Harish More is the Chairman of Yashomati Thakur group)

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व कोट्यधीश अमरावती बाजार समितीवर काँग्रेसच्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर गटाचे हरीश मोरे यांची सभापती तर सेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भैय्या निर्मळ यांची उपसभापतिपदी अविरोध निवड करण्यात आली. दोघेही अविरोध निवडून आल्याने निवडणूक केवळ औपचारिकता ठरली आहे.

अमरावती बाजार समितीवर प्रशासकांच्या सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर संचालक पदाची निवडणूक २९ एप्रिलला झाली. सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. संचालकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे सर्व १८ ही सदस्य निवडून आल्याने ही निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आधीपासूनच होती.

काल (ता. १९) सकाळी साडेअकराला निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. सभापतिपदासाठी काँग्रेसच्या हरीष मोरे व उपसभापतिपदासाठी सेनेच्या भैय्या निर्मळ यांनी अर्ज दाखल केले. केवळ या दोघांचेच अर्ज आल्याने दोघांचीही निवड अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक उपनिबंधक स्वाती गुडधे यांनी जाहीर केले.

Yashomati Thakur
Yashomati Thakur : सरकार अतिशय बेजबाबदार, राज्यात वाढतायेत अत्याचार

प्रवीण अळसपुरे यांचे नाराजी नाट्य..

उपसभापतिपदासाठी इच्छुक संचालक प्रवीण अळसपुरे यांनी त्यांचे नाव उपसभापतिपदासाठी रेटले होते. मात्र त्यांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यांनी मतदानापूर्वी आपली नाराजी जाहीर केली. मात्र निवडणुकीसाठी उपस्थित पत्रिकेवर स्वाक्षरी करून ते निघून गेले. त्यांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केल्या गेला. मात्र त्यांची नाराजी कायम होती.

Yashomati Thakur
Yashomati Thakur : आमदारच भुमक्यांकडून चटके घेतात, तेथे आदिवासींना काय सांगणार?

शेतकरी हिताचे निर्णय होतील..

बाजार समितीवर (APMC) आरूढ संचालक मंडळ आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतील. शेतकऱ्यांना (Farmers) आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचविण्याच्या प्रयत्नासोबतच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे संचालक मंडळ स्थापन झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली.

कोणताही राजकीय (Political) वारसा नसताना मला सभापतिपदावर आरूढ करण्यात आले आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मला माहीत असून जाणीव आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या लाभाचे काम करून संधीचे सोने करू, असे नवनिर्वाचित सभापती हरीष मोरे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com