Amravati APMC Election Results : महाविकास आघाडीने सहकारमधील भाजपचा प्रवेश रोखला !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने विजय मिळवत सहकारातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
Amravati APMC
Amravati APMCSarkarnama

Amravati District APMC Election Results News : सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरील काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या पदरी मात्र निराशाच आली. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या सहापैकी पाच बाजार समितींवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सहकारातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. (However, there was disappointment in the ranks of BJP)

नांदगाव खंडेश्वर बाजार समितीवर मात्र परंपरागत ढेपे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतला. विशेषतः भाजपने सहकार क्षेत्रात या माध्यमातून पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने एकीने लढत देत भाजपचे मनसुबे धुळीस मिळवले.

सहापैकी पाच बाजार समितींच्या संचालक मंडळावर एकहाती सत्ता मिळवली. भाजपला चांदूर रेल्वे व अंजनागावसुर्जी येथे प्रत्येकी एक जागा मिळाली. नांदगाव खंडेश्वरमध्ये महाविकासला अपेक्षीत यश मिळवता आले नाही. अमरावती, तिवसा, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे या चार बाजार समितींवर पूर्ण बहुमत मिळवले असून मोर्शी बाजार समितीत १० व नांदगाव खंडेश्वरमध्ये चार जागा मिळाल्या.

नांदगाव खंडेश्वर वगळता उर्वरित पाचही बाजार समितींवर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय क्षेत्राप्रमाणे सहकार क्षेत्रातही एकजुटीने निवडणुका (Elections) लढल्यास विजय हमखास आहे, हे या सहा बाजार समितीच्या निवडणुकीतील निकालाने सिद्ध केले आहे. विशेषतः काँग्रेसचा (Congress) सहकार क्षेत्रात अजूनही दबदबा आहे, हे जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे.

Amravati APMC
Amravati Loksabha : नवनीत राणांसमोर सध्यातरी नसणार कुणाचेच आव्हान, कारण महाविकास आघाडीचे ठरलेच नाही !

सहा बाजार समितीच्या १०८ संचालकांच्या जागांपैकी तब्बल ८७ जागा मविआने जिंकल्या आहेत. नांदगाव खंडेश्वरमध्ये ११ जागा अभिजित ढेपे गटाला तर मोर्शीत आठ आणि अंजगाव सुर्जी व चांदूर रेल्वे येथे प्रत्येकी एक, अशा २१ जागा भाजपप्रणीत पॅनलला मिळाल्या. सहकार क्षेत्रात पाय रोवण्याचे भाजपचे (BJP) मनसुबे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकीचे प्रदर्शन करीत उधळून लावले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com