
Amravati APMC Election Results News : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व कोट्यधीश अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने संचालक पदाच्या सर्व जागा जिंकत वर्चस्व मिळवले आहे. माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Both panels had to be overcome)
आमदार रवी राणा व भाजप पुरस्कृत शेतकरी तसेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बळीराजा पॅनलचा यशोमती ठाकूर यांनी पार धुव्वा उडवला. बाजार समितीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ९४ टक्के मतदान झाले होते. या बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला आमदार रवी राणा व भाजप पुरस्कृत शेतकरी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बळीराजा पॅनलने आव्हान दिले होते. मात्र दोन्ही पॅनलला मात खावी लागली.
सहकारात स्थान मिळवण्यासाठी आमदार रवी राणा यांनी जोर लावत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांना भाजपचे (BJP) खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, शिंदे गट, रिपाइंचा (गवई गट) व सहकार नेते विलास महल्ले यांचे समर्थन होते. मात्र सहकाराच्या राजकारणातील गोळाबेरीज त्यांना करता आली नाही.
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे शेतकरी पॅनेल भुईसपाट झाले. विशेष म्हणजे सभापती पदाचा चेहरा असलेले आमदारांचे बंधू सुनील राणा व यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या तंबूतून राणांच्या आश्रयास गेलेले माजी संचालकही पराभूत झाले. निकाल स्पष्ट होताच केवळ गोष्टी करणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे कोण, हे या निवडणुकीने दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर यांच्या समर्थकांनी दिली.
या निवडणुकीत (APMC Election) संतोष इंगोले, प्रताप भुयार, भय्या निर्मळ, किशोर चांगोले, हरीष मोरे, आशुतोष देशमुख, नाना नागमोते, रेखा कोकाटे, अलका देशमुख, प्रकाश काळबांडे, सतीश गोटे, राम खरबडे, मिलींद तायडे, श्रीकांत बोंडे, प्रवीण अळसपुरे राजेश पाटील, प्रमोद इंगोले व बंडू वानखडे यांचा विजय झाला. तर सुनील राणा, प्रकाश साबळे, रामेश्वर अभ्यंकर, माजी संचालक प्रफुल्ल राऊत, सतीश अटल, परमानंद अग्रवाल, प्रांजली भालेराव, प्रशांत काळबांडे यांना पराभव पत्करावा लागला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.