अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग : पहिल्या दिवशी ८ किलोमीटरचा टप्पा पार...

अमरावती (Amravati) अकोला (Akola) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा असतानादेखील महामार्ग बांधकामाचे आव्हान स्वीकारण्यात आले.
अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग : पहिल्या दिवशी ८ किलोमीटरचा टप्पा पार...
Amravati to Akola National HighwarySarkarnama

अमरावती : अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण ५ दिवस, रस्त्यावर अखंड बिटुमिनस काँक्रीट पेव्हिंगचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहिल्या दिवशी ३ जून रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी प्रारंभ झाल्यानंतर, सायंकाळी ६ वाजेपर्यंत, ९ मीटर रुंदीच्या रोडवर, ४००० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रीटचा टप्पा गाठला. म्हणजेच दोन्ही लेन मिळून ८ किलोमीटरचा टप्पा पार झालेला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, रखरखत्या उन्हात, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक व चमू न थकता, न दमता हा विक्रम गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम करीत आहेत. अमरावती (Amravati) अकोला (Akola) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा असतानादेखील महामार्ग बांधकामाचे आव्हान स्वीकारण्यात आले. या रखरखत्या उन्हात, ४१ डिग्री अंश सेल्सिअस तापमान असतानाही सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी एकजूट होऊन विक्रम पूर्ण करण्यासाठी कार्यमग्न आहेत.

या विक्रमाची नोंद घेण्यासाठी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीदेखील सहभागी झालेले आहेत. या सर्वांसाठी दुपारचे भोजन त्यांच्या त्यांच्या कार्याच्या ठिकाणी पोहोचविण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या विक्रमी ऐतिहासिक कार्याला प्रारंभ झाला असून, महामार्गावरील वाहतूकदेखील कुठेही खोळंबू न देता, अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेले आहे. मेन्टेनन्स विभागातील कर्मचारी, अरविंद गौतम म्हणाले, रोजगाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलो. २००२ पासून मी राजपथ इन्फ्राकॉन कंपनीत कार्यरत आहे. तेव्हापासून मराठी मातीत एकरूप झालो आहे.

या उपक्रमाची माहिती मिळाल्यापासून, आमच्यामध्ये एक नवीन जोश निर्माण झाला होता. आज सकाळी 5 वाजतापासून कामावर आहोत. मेंटेनंस विभागात कार्यरत असल्याने मोठी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया येथील कर्मचारी अरविंद गौतम यांनी दिली. तर गौरव गोरख यांनी सांगितले की, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी नेहमीच उच्च संकल्प ठेवून कार्य केले आहे. मागील वेळी, सातारा येथेही अशाच प्रकारे विक्रमी रस्ता बांधकाम झालेले आहे. त्यावेळी देखील आम्ही निष्ठेने काम केले. आज जागतिक विक्रम प्रस्थापित होत असताना, पुन्हा आनंद होत आहे. हे यश आम्ही नक्कीच गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Amravati to Akola National Highwary
हायवे ठेकेदाराचा पालकमंत्र्यांनाही ठेंगा :  परशुराम उपरकर   

खासदार नवनीत राणा यांची सदिच्छा भेट..

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या चारपदरी रस्ता बांधकामाच्या जागतिक विक्रमी कार्याला प्रारंभ झाल्यानंतर, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी आज दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज पथ इंफ्राक्रानचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार राणा म्हणाल्या जागतिक विक्रमी महामार्गाचे बांधकाम अमरावती जिल्ह्यात होत असल्याने अधिक आनंद आहे. या कार्यामुळे अमरावतीचा गौरव वाढेल. यावेळी त्यांनी या कार्यासाठी सर्व कामगार व अधिकारी-कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in