Amol Mitkari News: `चार दिवस सासूचे...’, असं का म्हणाले आमदार अमोल मिटकरी?

MLA Nitin Deshmukh's Sangharsh Yatra: या राज्यात सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

Nagpur News: मतदारसंघातील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष पदयात्रा घेऊन निघालेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावात नागपूर पोलिसांनी वागणूक दिली आहे, त्यावरून या राज्यात सैतानी साम्राज्याचा उदय झाला असल्याचे स्पष्ट होत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील बाळापूर आणि अकोला तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द केल्याच्या विरोधात आमदार देशमुख यांनी १० एप्रिलपासून अकोला ते नागपूर संघर्ष यात्रा सुरू केली होती. काल सायंकाळी ही यात्रा नागपूरच्या सीमेवर पोहोचली. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानी हा यात्रा धडकणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी आमदार देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेत मुस्कटदाबी केली आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाण्यास मनाई करणारे पत्र काल नागपूर पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिले होते. त्यानंतर आमदार देशमुख संघर्ष यात्रा घेऊन जाण्यावर ठाम असल्याने आज सकाळीच त्यांना नागपूरच्या सीमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले व शिवसैनिकांसोबत अकोल्याकडे रवाना केले. यावर राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून पोलिसांकडून हे काम करवून घेतले आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांच्या कारवाईला बेकायदेशीर म्हटले आहे. मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या आमदार देशमुख व त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक देण्यात आली. त्यावरून या राज्यात सैतानी साम्राज्य सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला.

Amol Mitkari
Amol Mitkari Vs Gopichand Padalkar: ''शरद पवारांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या...''; मिटकरींचा पडळकरांवर घणाघात

अकोला (Akola) जिल्ह्यातही आता राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. लोकशाही शिल्लक राहिली नाही. त्यांनी सत्ताधारी भाजपला (BJP) इशारा देताना ‘चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे’ असतात, ही जुनी म्हण त्यांनी लक्षात ठेवावी. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या सर्व प्रकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com