Amol Mitkari News : मंत्रालयातील कॅन्टीन चालकांवर गुन्हे दाखल; विनापरवाना ठेवत होते खाद्य पदार्थ !

Mumbai : लोकांच्या जिवाला धोका होऊ शकत होता.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

Mumbai Legislative Council News : एफडीएची परवानगी असल्याशिवाय कुठलेही खाद्य पदार्थ विकता येत नाही. येवढेच काय तर कॉफी वेंडींग मशीनही वापरता येत नाही. मंत्रालयात हा प्रकार सर्रास विनापरवानगी सुरू होता. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी आज सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला. (People's lives could be in danger)

यावेळी आमदार मिटकरी म्हणाले, चक्क मंत्रालयात जर असे प्रकार सुरू असतील, तर इतर ठिकाणचे तर बघायलाच नको. मंत्रालयात प्रत्येक माळ्यावर कॅन्टीन आहेत. यामध्ये विनापरवानगी खाद्य पदार्थ विकणे आणि कॉफी वेंडींग मशीन्स सुरू होत्या. त्यामुळे येथील लोकांच्या जिवाला धोका होऊ शकत होता. यासंदर्भात आज सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात हा प्रश्‍न उपस्थित केला.

अधिक माहिती घेतली असता अन्न सुरक्षा मानके कायदा २०११ नुसार या आस्थापनांनी नोंदणी घेतली नसल्याचे आढळले. सदर आस्थापनेत परवाना नाही. अशा कॅन्टीन चालकांच्या विरोधात सरकार (State Government) काय कारवाई करणार, अशी विचारणा आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली. हेल्थफुड अलाईंग सर्व्हिसेसकडून हे कॅन्टीन चालवले जातात. त्याच्यावर गुन्हे दाखल करणार का, असाही प्रश्‍न त्यांनी केला.

७ फेब्रुवारी २०२३ ला तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रत्येक माळ्यावर कॉफी वेंडींग मशीन आणि खाद्य विनापरवाना ठेवली जातात. त्याची आम्ही तपासणी केली. चौथ्या मजल्यावरील कॅन्टीनलाच फक्त एफडीएची परवानगी आहे. बाकी माळ्यांवर खाद्य पदार्थ आणि कॉफी विनापरवाना ठेवलेले आहेत.

Amol Mitkari
Amol Mitkari : ठाणेदाराने गणवेशात नेत्याचा वाढदिवस साजरा केला असेल, तर कारवाई निश्‍चित !

हा प्रकार करणाऱ्यांना आमच्या विभागाने आदेश दिले होते. पण तरीही त्यांनी विनापरवाना विक्री सुरूच ठेवली. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौथ्या मजल्यावरच्या कॅन्टीनला परवानगी आहे. इतर मजल्यांवर कॉफी वेंडींग मशीनला परवानगी नव्हती. मशीन काढण्यासाठी सूचना दिल्या. त्याही त्यांनी काढल्या नाही. त्यामुळे एफडीएने त्यांची कारवाई केली, अशी माहिती मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सभागृहाला दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com