Amol Mitkari : महाजनांकडून मिटकरींचा करेक्ट कार्यक्रम, गावातच बसला धक्का!

Amol Mitkari : विजयसिंह सोळंके यांनी केलेल्या तक्रारीनंतर महाजन यांच्या पुढाकारातून कारवाई झाल्याचे समजते आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkanama

अकोला : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. आमदार अमोल मिटकरी यांना जोर का झटका बसला आहे. भाजप नेते विजयसिंह सोळंके यांनी केलेल्या तक्रारीनंतर महाजन यांच्या पुढाकारातून कारवाई झाल्याचे समजते आहे. मिटकरी यांचे गाव कुटासा या ग्रामपंचायतील तब्बल 12 सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र 12 पैकी 10 सदस्य आमदार अमोल मिटकरी गट म्हणजेच, राष्ट्रवादीचे आहेत.

कुटासा गावातील सरपंच यांनी पंचायतील सदस्यांशी मिलिभगत करून 15 लाख रूपये मूल्य असलेले ग्रामपंचायत बिल्डींग पाडण्यात आल्याचा विजयसिंह सोळंके यांनी म्हंटले होते. ही बिल्डींग वादळामुळे पाडल्याचं कारण सरपंचांनी दिलं होतं. मात्र याची चौकशी झाल्यानंतर हे सांगण्यात आलेले कारण असत्य असल्याची बाब महाजन यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. महाजनांच्या या आदेशामुळे आता सलग जिल्हा परिषद, सहकारी सोयायटीमध्ये झालेल्या पराभवानंतर मिटकरी यांना हा त्यांच्या कर्मभूमीतच मोठा झटका आहे.

Girish Mahajan
शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना आले 'अच्छे दिन'

काय म्हटलं आहे आदेशात?

कुटासा ग्रामपंचायत इमारत ही सन २४/८५/८६ मध्ये रु. १५ लक्ष खर्च करुन बांधलेली असून श्री. अनंता रघुनाथ लाखे, सरपंच (ग्रामपंचायत, कुटासा ता. अकोट जि. अकोला) यांनी पूर्व परवानगी न घेता पाडली. याबाबतचे फोटो -पंचायत समिती सदस्य/ग्राम पंचायत सदस्य पानटपरी चालक यांचे प्रतिज्ञालेख व ग्रामस्थांचे निवेदन यामध्ये ग्रामपंचायत इमारत पाडली असे नमूद आहे.

अनंता रघुनाथ लाखे यांच्या म्हणण्यानुसार ग्राम पंचायतीची इमारत ही दिनांक २९/५/२०२१ रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये पडली आहे. मात्र तलाठी, कुटासा यांचे पत्र ०९.०६.२०२१ नुसार कुटासा येथे २९.०५.२०२१ रोजीचे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी वादळवारा याबाबतची कुठलीही नोंद उपलब्ध नाही असे नमूद आहे. पोलीस पाटील कुटासा यांचा दाखला ३१.०७.२०२१ मध्ये नमुद आहे की, दिनांक २९.०५.२०२१ रोजी चक्रीवादळ तसेच वादळ किंवा अतिवृष्टी झाली नसून कोणत्याच प्रकारची पडझड झाली नाही. तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कुटासा यांचे पत्र दिनांक ३१.०७.२०२१ मध्ये नमुद आहे की, दिनांक २९.०५.२०२१ रोजी कुटासा येथे कोणत्याही प्रकारचे चक्रीवादळ/अतिवृष्टी वादळ झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची पडझड नुकसान झाले नाही.

Girish Mahajan
Ncp : मोदी लाटेत निवडून आलेल्या चिकटगांवकरांची आधी उमेदवारी कापली, आता गच्छंती ?

सदर तलाठी, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे दाखले उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, अकोला यांनी सत्यप्रत केले आहे. ग्रामपंचायत इमारत २९. ०५. २०२१ रोजी पाडल्याचा अहवाल दिल्यानंतर उक्त ग्रामपंचायत इमारत पाडण्यासाठी २३. ०६. २०२१ चा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेमध्ये पडलेली इमारत पाडण्याचा ठराव का घेण्यात आला? या वरुन ३१.०५.२०२१ रोजी ग्रामपंचायतीने केलेला पंचनामा खोटा असल्याचे सिध्द होते.

खोटा पंचनामा करणे व पडलेला ग्रामपंचायत मलबा याचे संरक्षण करण्यास असमर्थ राहिल्याने सरपंच व सर्व सदस्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द होते. प्रतिवादी सरपंच यांनी आपल्या समर्थनार्थ कोणताही सबळ पुरावा या न्यायालयासमोर सादर केलेला नाही. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, वर नमूद मुद्यांवरुन सरपंच व सर्व सदस्यांनी आपले कर्तव्यात कसूर करुन नियमबाहयता केली असल्याचे सिध्द होत असल्याने विभागीय आयुक्त, अमरावती यांनी पारित केलेल्या आदेशात बदल करुन संबंधित १२ सदस्यांना अपात्र घोषित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com