Amit Shaha : अमित शाह यांच्यासाठी आज नागपुरात फुटाळा म्‍युझिकल फाऊंटनचा विशेष ट्रायल शो !

Nagpur : गृहमंत्री अमित शाह विशेष अतिथी म्‍हणून उपस्थित राहतील.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama

Amit Shaha News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्‍या महाराष्‍ट्र दौ-यावर येत आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते आज नागपुरातून करणार आहेत. आज सायंकाळी ७.४५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी फुटाळा येथे म्‍युझिकल फाउंटन आणि लाइट शोचा विशेष ट्रायल शो आयोजित करण्‍यात आला आहे.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने आयोजित या ट्रायल शोला गृहमंत्री अमित शाह विशेष अतिथी म्‍हणून उपस्थित राहतील व शोचा आनंद घेतील. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आदी अनेक मान्‍यवर यावेळी उपस्‍थ‍ित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्‍या या म्‍युझिकल फाउंटन शोला जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभलेले आहे.

बीग बी अम‍िताभ बच्‍चन, प्रख्‍यात गीतकार-दिग्‍दर्शक गुलजार व मराठीतील अतिशय लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची कॉमेंट्री आहे. समाजाच्‍या विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांच्‍या कौतुकास पात्र ठरलेल्‍या आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद म्‍युझिकल फाउंटन आणि लाइट शोला लाभला आहे.

उद्या १८ फेब्रुवारीला सकाळी १०.१५ वाजता अमित शाह दीक्षाभूमीला जातील. त्यानंतर १०.३० वाजता डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधिस्थळी माल्यार्पण करतील. दुपारी १.४५ वाजता नागपूर (Nagpur) विमानतळावरून पुण्यासाठी प्रस्थान करणार आहे.

दुपारी ३ वाजता पुणे येथे दैनिक सकाळद्वारा हॉटेल टिपटॉप येथे आयोजित सहकार परिषदेला उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता शहीद काश्मिरी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर ७.४५ वाजता मोदी २० मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन मॉडर्न कॉलेज ग्राऊंड येथे करणार आहेत.

Amit Shaha
Amit Shah In Pune: १८ला अमित शाह पुण्यात, हा निव्वळ योगायोग की ठरवलेला कार्यक्रम?

रविवारी १९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अम्बेगाव येथे शिव सृष्टीचे लोकार्पण. त्यानंतर दुपारी १ वाजता पुणे (Pune) विमानतळावरून कोल्हापूरसाठी रवाना होतील. १.४० वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण. त्यानंतर दुपारी ३ वाजता लोहिया हायस्कूलला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला अमित शाह (Amit Shaha) उपस्थित राहतील.

४.३० वाजता कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा विजय संकल्प रॅली आणि जिल्हा कार्यालय परिसरातील गणपती मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी ६.४५ वाजता कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ते दर्शनासाठी जाणार आहेत. सायंकाळी ८ वाजता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर रात्री ९.३० वाजता दिल्लीसाठी प्रस्थान करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com