मुनगंटीवार ‘एम्टाला’ लावणार होते फटाके, त्यापूर्वीच अमित शहांनी घेतली दखल…

आमदार मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी कर्नाटक एम्टाच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर अमित शहा Amit Shaha यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांना गंभीरपणे लक्ष घालण्‍यास सांगितले.
Amit Shaha and Sudhir Mungantiwar
Amit Shaha and Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील बरांज या गावातील लोकांच्या जमिनी घेऊन कर्नाटक एम्टाने त्यांना वाऱ्यावर सोडले होते. अनेक वेळा विनंती करूनही कंपनीचे अधिकारी मानत नव्हते. तेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना तीव्र आंदोलन केले आणि दिवाळीत कंपनीला फटाके लावू, असा इशारा दिला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि आता लवकरच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार आहे.

परवा परवाच आमदार मुनगंटीवार यांनी कर्नाटक एम्टाच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर अमित शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांना या प्रकरणी गंभीरपणे लक्ष घालण्‍यास सांगितले. त्‍यानुसार कोळसा खाण मंत्र्यांनी आमदार मुनगंटीवार यांना पत्र पाठवले, ते आजच प्राप्‍त झाले. सर्व संबंधितांसह दिल्‍लीला बैठक लावण्‍याचे निर्देश या पत्रात दिले आहेत. त्यामुळे आता बरांज गावातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्‍या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्‍यातील बरांज या गावी कोळसा खाणीतून कोळशाचे उत्‍खणन सुरू होते. त्‍यामध्‍ये त्‍या परिसरातील अनेक नागरिकांच्‍या जमिनी कंपनीने अधिग्रहण करून त्‍या बदल्‍यात नोकरी देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. नोकरी न दिल्‍यास त्‍याचा मोबदला देण्‍याचे कबूल केले होते. याशिवाय अनेक गोष्‍टी गावक-यांना कबूल केल्या होत्या, मात्र त्‍याची पूर्तता कंपनीने केली नव्‍हती. या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍याच्‍या दृष्‍टीने गावक-यांचे व तालुक्‍यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांचे एक शिष्‍टमंडळ आमदार मुनगंटीवार यांना भेटले. त्यांनी या संदर्भात मुंबईला खाण अधिकारी व शासकीय अधिकारी यांच्‍यासोबत एक बैठक घेतली.

खाण अधिका-यांनी १५ दिवसात प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन दिले होते. परंतु त्‍या संदर्भात कंपनीने काहीही न केल्‍यामुळे आमदार मुनगंटीवार यांनी भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एक मोठे आंदोलन करण्‍याचे आदेश दिले. १३ ऑक्टोबर एक मोठे आंदोलन करण्‍यात आले. त्‍याठिकाणी आमदार मुनगंटीवार यांनी खाण त्वरित बंद करण्‍याचे निर्देश दिले. तसेच बरांजला जाणारा रस्‍ता खाणीच्‍या वापरासाठी बंद करण्याबाबतही बजावले. त्‍यानंतरही गेल्‍या तीन दिवसात देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात यशस्‍वी आंदोलन सुरू होते.

Amit Shaha and Sudhir Mungantiwar
काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; कारण ठरले अमित शहा...

गृहमंत्री व कोळसा मंत्री यांच्‍या निर्देशानुसार ही बैठक लागणार असून तोपर्यंत या आंदोलनाला यशस्‍वीपणे तात्‍पुरती स्‍थगिती देण्‍याचा निर्णय आज घेण्‍यात आला. तरीही देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात हा लढा पुढे चालू राहील, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. आंदोलनाच्‍या यशस्वितेसाठी भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते चंद्रकांत गुंडावार, भाजयुमोचे महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजयुमो महाराष्‍ट्र प्रदेश सचिव अनिल डोंगरे, भद्रावती तालुका अध्‍यक्ष नरेंद्र जिवतोडे, प्रवीण ठेंगणे, आशिष देवगडे, संजय ढाकणे, संजय रॉय, चेतन शिंदे, आकाश वानखेडे, मारोती गायकवाड, माधव बांगडे, इमरान खान, अफजलभाई, प्रवीण सुर, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे, यशवंत वाघ, अमित गुंडावार, विजय वानखेडे, तुळशीराम श्रीरामे, प्रशांत डाखरे, संतोष नागापुरे, सत्‍तारभाई यांनी प्रयत्‍न केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com