अमित शहा लावणार चंद्रपूर जिल्हा बॅंकेची चौकशी, खासदार धानोरकरांचे यश...

त्याचा बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी सतत पाठपुरावा केला आणि आता अमित शहा (Amit Shaha) यांनी बॅंकेची चौकशी करू, असे आश्‍वासन त्यांना दिले आहे.
Balu Dhanorkar and Amit Shaha
Balu Dhanorkar and Amit ShahaSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेवरून जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट पडलेले दिसतात. काॅंग्रेसचे (Congress) खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सभागृहात लावून धरली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांना चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. याआधी नोकर भरतीची दोन प्रकरणे वादग्रस्त ठरली आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देऊन या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी १४ मार्चला लोकसभेत केली होती. त्याचा त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि आता अमित शहा (Amit Shaha) यांनी बॅंकेची चौकशी करू, असे आश्‍वासन त्यांना दिले आहे.

१४ मार्चला लोकसभेत शून्य प्रहरात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर खासदार धानोरकर यांच्याशी बँकेबद्दल पुढील मुद्द्य़ांवर चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होऊन संचालक मंडळ कार्यकाळ २०१२-२०१७ त्यानंतर ५ वर्ष जादा कालावधी संपल्या नंतरही मा . सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक १८/०२/२०२१ ला कालावधी संपलेल्या बँकांवर प्रशासक नेमून निवडणुका घ्याव्यात व तो पावतो धोरणात्मक निर्णय घेऊ नये याप्रकारे आदेशात नमूद असुनही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वोच्च न्यायालयाचे १८/०२/२०२१ चे निर्णयानंतर कोविड काळात आभासी पद्धतीने दिनांक २७/०३/२०२१ व दिनांक ३० / ० ९ / २०२१ ला सर्वसाधारण सभा घेऊन विविध प्रकारचे अनेक निर्णय सहकारी संस्थांच्या अहिताचे निर्णय निवडणुका आपल्यालाच जिंकता याव्यात व भविष्यात विरोधक यांना निवडणुका जिंकता येऊ नये असे पोटनियम दुरुस्त्या करणे, बँकेच्या रेकॉर्डमध्ये बदल करणे, खोडसाळपणा करणे बदलवणे, मागील दोन नोकर भरतीत गैरव्यवहार होऊनही नव्याने नोकर भरतीची मागणी करणे, नव्याने बँकेसाठी जागा व बांधकाम करणे.

Balu Dhanorkar and Amit Shaha
आमदार धानोरकर म्हणाल्या; जिल्हा बॅंकेचा व्यवस्थापक ४२० आहे, चौकशी करा...

रोजंदारीवर मुख्यालय, शाखा, बँक पदाधिकारी व संचालक यांच्याकडे व महिला बचतगट यांचे संगोपनाच्या नावाखाली प्रत्येक शाखेत महिला अधिकारी नेमणे असे २०० रोजंदार नेमून बँकेतून पगार काढणे, बँकेचे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना २५ हजारावर पदाधिकारी यांचे सल्लागार नेमणे, खाजगी बँकांमध्ये ५०० कोटीची गुंतवणूक करणे, NPA कमी करण्यासाठी चालू पीक कर्जाची वसुली थकीत कर्जात वळती करणे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेणे, केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, शेतकरी कल्याण निधीचा केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळी विभागाच्या योजना असतानाही राजकीय हेतूने फक्त ५ तालुक्यांत ५८ लाखांपैकी ५० लाखांचे निधी वितरण करणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेमताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी घेण्याचे नाकारून जाहिरात देण्याचे नाटक करून मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांच्यावर दोन गंभीर आर्थिक गुन्ह्यांत विविध कलमांखाली गुन्हे दाखल असताना नेमणूक दिनांक ३१/०३/२०२१ ला करून RBI , NABARD व सहकार खात्याची दिशाभूल करणे, अशा गैरकृत्यांमध्ये सहभागी पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन विभागाचे अधिकारी यांची चौकशी करावी हे मुद्दे खासदार धानोरकर यांनी मांडले होते. चर्चेनंतर अमित शहा यांनी खासदार धानोरकर यांना सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in