फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहा गायब, महाराष्ट्रातले नेते संतापले...

संदीप जोशी फडणवीसांचे (Devendra Fadanvis) खंदे समर्थक आणि मित्र आहेत. शुभेच्छा फलकावरून अमित शहा (Amit Shaha) यांचा फोटो गायब करून त्यांनी संताप व्यक्त केला.
Devendra Fadanvis on Banner.
Devendra Fadanvis on Banner.Sarkarnama

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे शिर्षस्थ नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अगदी शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद हिसकावून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. त्यामुळे फडणवीसांचे समर्थक चांगलेच खवळले आहेत. फडणवीसांना शुभेच्छा देणाऱ्या सर्व बॅनरवरून अमित शहा यांना गायब करण्यात आले आहे.

नागपुरात (Nagpur) माजी महापौर संदीप जोशी यांनी हे बॅनर लावले आहेत. संदीप जोशी फडणवीसांचे (Devendra Fadanvis) खंदे समर्थक आणि मित्र आहेत. आपली नाराजी आदी त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून जाहीर केली आणि शुभेच्छा फलकावरून अमित शहा (Amit Shaha) यांचा फोटो गायब करून त्यांनी संताप व्यक्त केला. जोशी शुभेच्छुक असलेल्या बॅनरवर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचे फोटो आहेत. बॅनरवर पक्षाचे चिन्हदेखील आहे.

‘प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार, तुझ्यापुढे आम्ही खूप खुजे आहोत. तुला आमचा सलाम...’ असा मजकूर बॅनरवर लिहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस समर्थक अमित शहा यांच्यावर भडकलेले आहेत, असाच संदेश हा फलक देतो आहे. नागपूरपासून तर मुंबईपर्यंत असेच फलक लावले गेले असल्याची माहिती आहे. फडणवीस समर्थकांपैकी काहींना बोलून, काहींनी सोशल मिडियावर राग व्यक्त केला. पण संदीप जोशी यांनी शहरात धडाक्याने बॅनर लावत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर संताप व्यक्त केल्याची चर्चा शहरात आहे.

काल महाराष्ट्रानं जे अनुभवलं, ते यापूर्वी कधीही घडलं नसावं. देवेंद्र फडणवीस, जे मुख्यमंत्री होणार होते, त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली आणि गुवाहाटीला असताना ज्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, ते एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री बनले. या घटनाक्रमात जे २०१४ ते २०१९ असे पाच आणि २०१९ पासून आजतागायत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी जे झटले, त्या देवेंद्र फडणवीसांसाठी अनेकांचे मन दुखावले गेले असल्याचे आज घडणाऱ्या घटनांमधून दिसतंय.

Devendra Fadanvis on Banner.
देवेंद्र फडणवीस यांनी कमी केले जनता आणि उपमुख्यमंत्र्यांमधील अंतर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यामुळे भाजपमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ची परिस्थिती आहे. तेच मुख्यमंत्री व्हावे, असे अनेकांना वाटत होते. येवढेच काय पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा पत्र लिहून फडणवीसांच्या औदार्याचे मनापासून कौतुक केले. असेच एक पत्र नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीसांना लिहिले आहे आणि त्यातल्याच चार ओळी त्यांनी फलकावर घेतल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com