Prakash Ambedkar : आंबेडकरांनीही दिला एकजुटीचा सल्ला; पण आठवलेंना काढले चिमटे...

त्यांचा हा सल्ला बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मान्य करत उद्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपण एकसंघ राहिले पाहिजे, असे सांगितले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

अकोला : जेव्हा जेव्हा आपण सर्व एकत्र आलो, तेव्हा यश मिळालेच आहे. त्यामुळे रिपाइंच्या सर्व नेत्यांनी आता एकत्र आले पाहिजे. असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी नागपुरात म्हटले होते. त्यांचा हा सल्ला बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मान्य करत उद्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपण एकसंघ राहिले पाहिजे, असे सांगितले. पण हे सांगताना त्यांनी आठवलेंना चांगलेच चिमटे काढले.

बारा बलुतेदार, अलुतेदारांनो सत्तेचा माज अंगात येऊ देवू नका. उद्याची परिस्थिती काय असेल, हे सांगता येत नाही. महागाई, आर्थिक संकट डोक्यावर आहे. हुकूमशाहीने चालणाऱ्या सत्तेचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजूट राहणे हाच एक पर्याय असल्याचा संदेश वंचित ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भारतीय बौद्ध महासंघाच्यावतीने अकोला (Akola) क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंबेडकरी चळवळीतील मंत्र्यांच्या खुर्चीला चिकटून असलेल्या नेत्यांना व त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या विचारवंतांना चांगलेच चिमटे घेतले.

आंध्रप्रदेशाच्या विभाजनापूर्वीच्या तेथील सत्तेचे उदाहरण देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेचा माज डोक्यात गेल्याने सत्ता कशी घालविली जाते, हे सांगितले. सोबतच त्यांनी उद्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकसंघ राहण्याचा सल्लाही दिला. लोकसेवक म्हणून सत्ता चालविणारे हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहेत. त्यांची सत्ता घालविण्यासाठी लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला. राज्यात होऊ घातलेल्या आगामी सरपंच निवडणुकीत स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

महागाई रोखा, अन्यथा आर्थिक संकट..

राज्य कसे चालवावे, हेच माहीत नसलेल्यांच्या हाती सत्ता आहे. विदर्भातील मुख्यमंत्री आहे. मात्र, विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रुपयाची किंमत घसरत असल्याने महागाई वाढली आहे. ही महागाई वेळीच थांबविली नाही, त आर्थिक संकट वाढणार, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Satara : प्रकाश आंबेडकर म्हणतात, हे तर घोषणाबाजांचे सरकार...

खुर्चीला चिकटून असलेल्यांना काढले चिमटे..

आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेकांनी सत्ता मिळविली. काही तर कायम स्वरूपी खुर्चीला चिकटून आहेत. त्यांना कायमचे मंत्रिपद दिले पाहिजे, असा टोला लावून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लक्ष्य केले. आठवले यांनी नुकतेच वंचित बहुजन आघाडी रिपाइंमध्ये विलीन करण्याचे आवाहन केले होते. त्याला अप्रत्यक्षपणे ॲड. आंबेडकर यांनी उत्तर दिले.

भरपावसात सभा..

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसातच ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू झाले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी भर पावसातही नागरिक मैदानात थांबून होते. यावेळी पुन्हा सभा घेण्याचे आश्वासन त्यांनी देऊन सभा आटोपती घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com