Ambadas Danve News: राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची फसवणूक !

Border Issue : सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी खितपत पडली आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Budget Session : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सांगितले की, आता आपण अमृतकाळात प्रवेश करीत आहोत. पण महाराष्ट्र अमृतकाळात जाणार का, याचे उत्तर राज्यपालांच्या अभिभाषणात मिळत नाही. केवळ स्वप्नं दाखवले जात आहे. मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणात यापेक्षा जास्त काहीच नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

राज्यपालांच्या अभिभाषणाचा विरोध करीत दानवे म्हणाले, फारच फार झालं तर निर्णय घेतले जातात आणि ते जाहीर करून प्रसिद्धी मिळवली जाते. पण निर्णयावर अंमलबजावणी होत नाही. सीमा भागातील लोक त्रस्त आहे. सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी खितपत पडली आहे. राज्य सरकार पुढाकार घेत नाही. बेळगावच्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे.

मुख्यमंत्री दावोसला गेले. मोठी गुंतवणूक आणल्याचे सांगितले. पण त्यात तथ्य नाही. कारण ज्या कंपन्या सरकारने सांगितल्या, त्या स्थानिक आहेत. जी कंपनी अमेरिकेची असल्याची सांगितले जात आहे, त्यातील एक कंपनी छत्रपती संभाजी नगर येथील आहे. अग्रवाल त्याचे मालक आहे. ही कंपनी २० हजार कोटीचा कोळशाचा प्लांट उभारणार आहे.

कंपनी संभाजी नगरची आहे, तर त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय आहे? दुसरी एक कंपनी १५०० कोटीचा स्टील प्लांट उभारणार आहे. तिसरी कंपनी युरोपची सांगितली जात आहे, पण प्रत्यक्षात ती चंद्रपूरची आहे आणि स्थापना १२ जून २०१०ची आहे, असे आरोप दानवेंनी (Ambadas Danve) केले.

Ambadas Danve
Ambadas Danve News : हे सरकारच अदानींच्या ताब्यात देवून टाका, अंबादास दानवे का संतापले ?

राज्य सरकारने (State Government) सांगितलेल्या २० पैकी १० कंपन्यांची माहिती माझ्याकडे आहे. राज्यातील जनतेची फसवणूक अभिभाषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गडचिरोली Gadchiroli) आणि गोंदिया (Gondia) मध्ये उद्योग उभारण्याच्याही केवळ बाताच आहेत. सुरजागडमध्ये स्थानिकांना रोजगार दिलेला नाही.

एकूण ३५२५ लोकांना रोजगार दिला आहे. त्यातील ५१३ लोक फक्त स्थानिक आहेत. त्यातही ५११ मजूर आहेत. दोघेच फक्त एक्झीक्युट्युव्ह आहेत. हे आकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदिवासी बांधवांची ही फसवणूक आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in