केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरलेत...

हा बंद म्हणजे स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी केली होती.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरलेत...
Nana PatoleSarkarnama

नागपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने लखीमपूरला शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी नेऊन त्यांना चिरडले, त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करत आहेत का? शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांचं समर्थन फडणवीस करत आहेत का? असे प्रश्‍न करीत केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरलेले आहेत, अशी तोफ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डागली.

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने काल महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यावर हा बंद म्हणजे स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना नाना पटोले काल रात्री नागपुरातील विमानतळावर ‘सरकारनामा’शी बोलत होते. पटोले म्हणाले. देशाचे गृहमंत्री असतील, देशाचे गृहराज्यमंत्री असतील त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, काय काय केसेस आहेत, हे देशातील सर्व लोकांना माहीत आहे. आज आम्ही जो बंद पाळला, त्यात जनभावना होती. त्याचा आदर करून महाविकास आघाडीने कालचा बंद पाळला. जर फडणवीस याला स्पॉन्सर्ड दहशतवाद म्हणत असतील, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं हे त्यांनी तपासावे.

बंद करायचा आणि राज्यातील शेतकऱ्यांना मदत करायची नाही, अशीही टिका फडणवीस यांनी केली होती. त्यावर नाना पटोले म्हणाले, फडणवीस ज्यावेळी सत्तेत होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं होतं. आता शेतकरी शेती करत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांचं दुःख त्यांना समजलं नाही. पण या सरकारला कळत आहे. परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीपूर्वी कर्ज घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे. केंद्र सरकार मात्र मदत देत नाहीये. गुजरातमध्ये १ हजार कोटींची मदत दिली. दुजाभाव केंद्र सरकार करत आहे. हे शेतकऱ्यांचे हत्यारे आहेत. त्यांना शेतकऱ्यांचं किती हित आहे, हे शेतकऱ्यांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे यांच्या लबाडीला यापुढे कुणी फसणार नाही.

मावळमध्ये झालेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध केला होता. आमचे नेते राहुल गांधी त्या ठिकाणी आले होते. लखीमपूरच्या घटनेचा मोदींनी निषेध केला की नाही, माहिती नाही. मात्र लखीमपूरमध्ये पंतप्रधान मोदी जात नाही. त्याठिकाणी सत्कार मात्र ते स्वीकारतात. या घटनेची थोडीशी खंतही ते व्यक्त करत नाही. म्हणून भाजप शेतकऱ्यांबद्दल जी भूमिका मांडत आहे, हीच खरी नौटंकी आहे. भाजप नेते शेतकऱ्यांचे हत्यारे आहेत, हे आता सिद्ध झाले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
पटोले म्हणाले, ‘दादा’पेक्षा ‘नाना’ मोठा...;पाहा व्हिडिओ

आज ज्या पद्धतीनं सर्व पोर्ट अदानीकडे दिले जात आहेत, हेच खरे संशयास्पद आहे. यापूर्वी कितीदा गुजरातच्या पोर्टवर ड्रग्स आले असतील, हे सांगता येत नाही. कमी दरात देश विकण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. मात्र देशाच्या सुरक्षेशी केंद्र सरकारला काहीही घेणेदेणे नाही, असेच दिसतेय. काही मूठभर उद्योगपतींना हाताशी धरून देश बरबाद करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे आणि ही बाब आता देशवासीयांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे यापुढे जनता भाजपला थारा देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.