Raj Thackeray|
Raj Thackeray|

विदर्भातील मनसेची सर्व प्रमुख पदे बरखास्त; घटस्थापनेला नव्या कार्यकारिणीची स्थापना

Raj Thackeray| लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती,

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी विदर्भातील मनसेची सर्व प्रमुख पदे बरखास्त केली आहेत. मुंबईत येत्या २७ सप्टेंबरला पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक होईल आणि घटस्थापनेला नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी, विरोधीपक्षांवरही चौफेर टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नागपूरात मनसेच्या कामावर समाधानी नसल्याने ही प्रमुख पदे बरखास्त करत आहेत. आता पर्यंत आमचही दुर्लक्ष झालं पण आता होणार नाही.

Raj Thackeray|
Sharad Pawar : कारण नसताना राऊतांना भाजपवाल्यांनी जेलमध्ये टाकलं..

मनसे आणि भाजपची युती होणार का, असे विचारले असता ते म्हणाले. वृत्तपत्रात आज आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. १६ वर्ष झाली जसा पक्ष पाहिजे होता, तसा नाहीये. म्हणून काही पदे बरखास्त केली. इतर शहरांमध्ये जो आमचा पक्ष आहे. तो विदर्भात तयार झाला नाही. प्रत्येक जण च्यावेळी मोठा होतो, तो प्रस्थापितांच्या विरोधात लढा देऊनच होतो. हा विदर्भ पहिल्यांदा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपने त्यांच्या विरोधा लढा दिला. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला झाला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती, पण तुम्ही युती आघाड्या करुन निवडणूका लढवता, आणि निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळचा शपथविधी करतो. शिवसेना-भाजप युतीच्या सुरवातीला, मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भाजपचे प्रमुख नेते यांनी ठरवलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. त्यानंतर चार साडेचार वर्षांत भाजपने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही, मग आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसं मागितलं. असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in