Akot Bazar Samit Result : प्रस्थापितांचे वर्चस्व मोडून काढत, सहकार पॅनेलच्या १५ उमेदवारांचा विजय!

Akot Bazar Samit Result : सहकारातील दिग्गज नेत्यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीमध्ये एकूण चार पॅनल आमने-सामने ठाकले होते.
Akot Bazar Samit Result :
Akot Bazar Samit Result :Sarkarnama

Akot Bazar Samit Result : अकोटमधील माजी आमदार व प्रशासक यांच्या राजकीयवर्चस्वाला धक्का देत, त्यांच्या पॅनेलचा पराभत करत, अकोट कृषी उत्पन्न बाजार (Bazar Samiti) समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. येथे एकूण १५ जागांवर विजय मिळवत एकतर्फी विजय मिळवला. येथे सहकार पॅनेलने सत्ता कायम राखली आहे.

व्यापारी अडते मतदारसंघातून रितेश अग्रवाल व सुनील गावंडे बिनविरोध निवडून आले होते. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. शनिवारी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट झाले.

Akot Bazar Samit Result :
Parli APMC Result News : धनंजय मुंडेची खेळी, शेठ पडले अन् मुनिम निवडून आले..

अकोल्यानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी अकोट बाजार समिती आहे. सहकारातील दिग्गज नेत्यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीमध्ये एकूण चार पॅनल आमने-सामने ठाकले होते. त्यात बाजार समितीमध्ये प्रशासक राहिलेले जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांच्या जयकीसान पॅनलसह माजी आमदार संजय गावंडे यांच्या शेतकरी पॅनल, अतुल म्हैसने यांच्या कास्तकार पॅनलचा व रमेश हिंगणकर यांच्या सहकार पॅनलचा समावेश होता. हिंगणकर हे सरकारातील ज्येष्ठ नेते. त्यांनी या चौरंगी लढतीमध्ये बाजी मारत अकोट बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली आहे.

Akot Bazar Samit Result :
Bazar Samiti Result : बीड जिल्ह्यात बाजार समित्यांवर आघाडीची बाजी; आडसकरांनी केज राखलं

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून विजय उमेदवार :

पाचडे प्रशांत मनोहरराव

हिंगणकर धीरज रमेशराव

खोटरे अतुल वामनराव

राहाणे विजय मधुकर

इंगळे बाबुराव रामचंद्र

तरोळे श्याम पुर्णाजी

डाफे गजानन गोविंदराव

सेवा सहकारी संस्था महिला विजयी उमेदवार :

सोनोने अंजली विशाल

आतकड अरुणा राजीव

सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय :

जायले अविनाश मोहनराव

निधीसूचित विमुक्त जाती,भटक्या जमाती :

वानखडे रमेश काशीराम

ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये विजयी उमेदवार :

वसू कुलदीप भीमराव

सपकाळ श्रीकांत ज्ञानदेवराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com