Akot APMC Election : सभापतिपदी ज्येष्ठ, अनुभवी संचालक, की तरुण रक्ताला देणार वाव !

APMC : सहकार गटाने एकहाती सत्ता काबीज करून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
Akot APMC
Akot APMCSarkarnama

Akola District's Akot APMC Election : अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड शनिवारी (ता. २० मे) होणार आहे. सभापतिपदासाठी इच्छुक असलेले संचालक आपापल्या परीने सहकार पॅनलच्या पक्षश्रेष्ठींना साकडे घालत आहेत. मात्र, सदर निवड ही सर्व सहमतीने करण्याचा सहकार पॅनलचा अजेंडा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Those in the know say that the cooperation panel has an agenda)

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार गटाने एकहाती सत्ता काबीज करून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. निवडणुकीमध्ये प्रथमच तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते, पण लढत झालेल्या सर्व १५ जागांवर सहकार गटाने आपले उमेदवार निवडून आणून बाजार समितीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले. आता सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित झाला असून, २० मे रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे सभापती-उपसभापती पदासाठी इच्छुक असणाऱ्या संचालकांनी सहकार गटाच्या वरिष्ठांना साकडे घालायला सुरुवात केली आहे.

निवडीकडे अनेकांचे लक्ष..

सहकार गटाचे निवडून आलेले उमेदवार पाहता त्यामध्ये जुने जाणते संचालक तर आहेतच. पण त्यासोबतच काही तरुणांनासुद्धा यावेळी संधी देण्यात आली. संचालक मंडळामध्ये नव्या व जुन्या संचालकांचा समावेश आहे. सभापतिपदी तरुण रक्ताला वाव देण्यात येतो की, ज्येष्ठ संचालकाला सभापती करून तरुणाईला उपसभापती म्हणून अनुभव घेण्याची संधी देण्यात येते, याकडे राजकीय जाणकाराचे लक्ष लागून आहे.

सहकार गटाच्या झेंड्याखाली (Congress) काँग्रेस, (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस, (Prahar) प्रहार, (BJP) भाजप, शेतकरी संघटना आदी पक्षांचे समर्थक व कार्यकर्ते समाविष्ट आहेत. त्यामुळे सर्वांचा विचार घेऊन या दोन पदांवर कोणाला बसवायचे, हे ठरविले जाईल, असे एका जबाबदार सूत्राने सांगितले.

Akot APMC
Akola riots : कॅमेऱ्यात जे दिसले, त्यांना अटक करून उपयोग नाही; त्याच्या मागे कोण, हे शोधा…

अकोट-चोहट्टा समतोल साधणार का?

यापूर्वी सहकार गटाने सभापती व उपसभापती निवडीबाबत अकोट (Akot) व चोहट्टा या दोन भागांचा समतोल साधून वाटप केले होते. एक पद अकोटला, तर दुसरे पद चोहट्टा भागाला देण्याचा सहकार गटाचा पायंडा आहे. तो यावेळीसुद्धा पाळली जातो का, याकडेही लक्ष लागून आहे. नवनिर्वाचित संचालक व सहकार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांची संयुक्त सभा लवकरच होणार आहे. या सभेत सर्वांची मते जाणून घेऊन सर्व सहमतीने सभापती व उपसभापती ठरविण्यात येतील. असे ज्येष्ठ सहकार नेते रमेश हिंगणकर म्हणाले.

चर्चेतील नावे..

सभापती व उपसभापती पदासाठी धीरज हिंगणकर, प्रशांत पाचडे, गजानन डाफे, विजू राहणे, रमेश वानखडे, अतुल खोटरे, गोपाल सपकाळ यांपैकी काही नाव सभापती पदासाठी, तर काही उपसभापती पदासाठी चर्चेत आहेत. शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर होते, हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com