
Raosaheb Danve at Akola Old City : त्यांच्या हातात शस्त्र होते, दगड भिरकावत होते, जो दिसेल त्याला मारहाण केली जात होती. दोन-अडीच तास उच्छाद मांडला होता. तोपर्यंत पोलिस व त्यांची गुप्तचर यंत्रणा कुठे होती, असा प्रश्न अकोला येथील जुने शहरातील संवेदनशील भागातील महिलांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना केला. (Where were the police and their intelligence agencies?)
महिलांनी झालेल्या नुकसानाचा पाढाही वाचला. भरपाई मिळाली नाही तरी चालेल, पण उच्छाद मांडणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी, असा आग्रह या महिलांनी धरला. अकोला येथील हरिहर पेठ परिसरातील शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. त्यांनी संवेदनशील भागातील नागरिकांची भेटही घेतली. यावेळी नागरिकांनी त्यांना शनिवारच्या (ता.१३) रात्री समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यानंतरही आपबिती कथन केली.
धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असल्याची चर्चा रंगली आणि एक गट आक्रमक होत रस्त्यावर उतरला होता. या भागाची पाहणी अंबादास दानवे व आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी माजी आमदार (MLA) गजानन दाळू गुरुजी, जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गट नेते गोपाल दातकर, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, अतुल पवनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया म्हैसने, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, मंजूषा शेळके, नितीन ताकवाले, नितीन मिश्रा, अनिल परचुरे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी केली आपबिती कथन..
विरोधी पक्ष नेते दानवे यांनी नागरिकांशी चर्चा केली, तेव्हा नागरिकांनी घटनेच्या दिवशीची आपबिती कथन केली. दंगलखोरांनी हातात पाईप, शस्त्र घेऊन हल्ला केला. दुचाकी जाळल्या. वाहनांची पाइपने तोडफोड केली. घरांवर दगडफेक केली. फटाके फोडून घर जाळण्याचा प्रयत्न केला. कार जाळली, असे सांगताना एका महिलेच्या डोळ्यांत अश्रू आले. एका युवकाने पायावर झालेल्या जखमांच्या खुणाच दाखवल्या. दानवे यांनी संबंधित नागरिकांना धीर दिला व त्यांचे सांत्वन केले.
मृत गायकवाडच्या कुटुंबीयांची घेतली भेट..
अकोल्यात (Akola) शनिवारी दोन समाजात उफाळून आलेल्या संघर्षात मृत पावलेल्या विलास गायकवाडच्या घरी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांत्वनपर भेट दिली. कुटुंबाविषयी माहिती जाणून घेतली. आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) व शिवसेना (Shivsena) पक्षाने या कुटुंबाची जबाबदारी घेतली असून, मुलीच्या लग्नास मदत करणार असल्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.