Akola : ZP व महापालिकेत वाद सुरू असताना शॉपिंग मॉलचा ठराव, वाद चिघळणार !

Court Case : जागेच्या मालकीबाबत महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे.
Akola ZP
Akola ZPSarkarnama

Akola ZP and Municipal Corporation News : अकोला येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रतनलाल प्लॉटमधील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेच्या जागेवरून महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आधीच वाद सुरू आहे. अन् त्यातच आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तेथे शॉपिंग मॉल बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या जागेच्या मालकीबाबत महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे. हा वाद संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे जि.प.चे सत्ताधारी व महापालिकेतील पदाधिकारी यांच्यात भविष्यात वाद वाढण्याची शक्यता बळावली आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येताच आज जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात जि.प.ची सर्वसाधारण सभा पार पडली.

सभेत गत दोन अडीच महिन्यांपासून आचारसंहितेमुळे रखडलेले विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्यांपैकी जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी उर्दू शाळेच्या जागेवर शॉपिंग मॉल बांधल्यास त्यापासून जि.प.चे उत्पन्न वाढेल, असा मुद्दा वंचितचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी उपस्थित केला. या जागेवर महापालिकेचे नवे कार्यालय प्रस्तावित असून जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयात सुद्धा उर्दू शाळेच्या जागेवर जि.प.चा शॉपिंग मॉल प्रस्तावित करण्यात आला आहे, असे सांगता येईल, असे ते म्हणाले.

या विषयाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेत अकोला (Akola) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, महिला व बाल कल्याण सभापती रिजवाना परवीन शे. मुसा, सभापती योगिता रोकडे, सभापती माया नाईक, आम्रपाली खंडारे, अतिरिक्त सीईओ डॉ. सुभाष पवार, वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने, प्रतीभा भोजने, पुष्पा इंगळे, राम गव्हाणकर, नीता गवई, शिवसेनेचे गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर, सुनील धाबेकर व इतरांची उपस्थिती होती.

Akola ZP
Nagpur : आश्‍वासन जनतेच्या कामांचे, लक्ष्य ठेकेदारी; ZP सदस्यांची अशी सुरू आहे धडपड !

मालमत्तेचा मुद्दा गाजला..

सभेत जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे यांनी शहरातील इतर जि.प.च्या (ZP) मालकीच्या जागांवर मुद्दा उपस्थित केला. वसंत देसाई क्रीडांगणाची जागा सुद्धा जि.प.ची असल्याचे वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले. या जागेचे भाडेसुद्धा वसंत देसाई क्रीडांगण प्रशासनाद्वारे देण्यात येत नसल्याचे सभेत सांगण्यात आले. याव्यतिरिक्त सभेत शहरालगत असलेल्या गावांमध्ये जि.प.ने गाळे बांधले होते, त्याचे भाडे सुद्धा जि.प.ला मिळत नसल्याचे सुलताने यांनी सांगितले. त्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com