Akola Gram Panchayat Election: चार ग्रामपंचायतींसाठी अर्जच नाही; तर तीन ग्रामपंचायती अविरोध...

Election News: जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
Akola Grampanchayat Election
Akola Grampanchayat ElectionSarkarnama

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत सरपंचाच्या २६६ पदांसाठी तर सदस्यांच्या २ हजार ७४ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांसाठी ७ डिसेंबर शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत सरपंच व सदस्य पदांसाठी उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे चार सरपंचाचे व ५५८ सदस्यांची निवड अविरोध झाली आहे. त्यामुळे आता सरपंच पदाच्या २५८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

जिल्ह्यातील अकोला, (Akola) तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच (Sarpanch) पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान सरपंच व सदस्य पदांसाठी पाच हजार ९८५ अर्ज प्राप्त झाल्याने सदर अर्जांची छाननी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) यांच्यामार्फत करण्यात आली. त्यापैकी सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंचांसह सदस्यांचे पद अविरोध झाले आहेत. त्यानुसार आता २५८ सरपंच पदासाठी तर १ हजार ५२० सदस्य पदांसाठी निवडणूक (Election) होत आहे.

अशी आहे अविरोध सदस्यांची संख्या..

- निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायतींची संख्या - २६६

- एकूण प्रभाग संख्या - ८१७

- एकूण सदस्य संख्या - २०७४

- अविरोध झालेल्या ग्रा.पं. (सरपंच वगळून)- ०५

- एकूण अविरोध पूर्ण प्रभाग - १३१

- एकूण अविरोध सदस्य संख्या - ५५४

अशी आहे सरपंच पदांची स्थिती..

- ग्रामपंचायतींची संख्या - २६६

- सरपंच संख्या - २६६

- सरपंच पद अविरोध झालेल्या ग्रा.पं. - ०४

- सरपंच पद एकही अर्ज प्राप्त न झालेल्या ग्रा.पं. - ०४

- सरपंच पदासाठी निवडणूक होणाऱ्या ग्रा.पं. - २५८

सरपंच पदासाठी अविरोध व अर्ज न मिळालेल्या ग्रा.पं.

- ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत तेल्हारा तालुक्यातील हिंगणी खुर्द, अकोट येथील धामणगाव, अकोली जहागिर, मूर्तिजापूर येथील उमरी ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत.

- अकोट तालुक्यातील बांबर्डा, अकोला तालुक्यातील भौरद, बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा, पातूर तालुक्यातील गोंधडवाडी येथील सरपंच पदांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

या या ग्रामपंचायती झाल्या अविरोध..

- तेल्हारा तालुक्यातील टाकळी (सरपंच वगळून) सर्व सदस्य अविरोध

- अकोट तालुक्यातील धामणगाव (सरपंचासह) सर्व सदस्य अविरोध

- अकोला तालुक्यातील बादलापूर, पाळोदी (सरपंच वगळून) सर्व सदस्य अविरोध.

Akola Grampanchayat Election
ग्रामपंचायत निवडणूक : कॉंग्रेसमध्ये ‘भारत जोडो’चा उत्साह; शिंदे-ठाकरे गटांची अग्निपरीक्षा

३.१० लाख मतदार ठरवणार ४ हजार २३५ उमेदवारांचे भवितव्य..

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदाच्या २५८ जागांसह सदस्य पदाच्या एक हजार ३५४ जागांसाठी तीन हजार २९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ८३३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीत तीन लाख १० हजार २४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून चार हजार २३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरपंच व सदस्य पदांसाठी पाच हजार ९८५ अर्ज प्राप्त झाल्याने सदर अर्जांची छाननी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली. त्यापैकी सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. चार सरपंचपदांची निवडणूक अविरोध झाली असून, चार सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने २५८ सरपंच पदांसाठी ९३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ५५४ सदस्यांची निवडणूक अविरोध झाली असून ६६ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने १ हजार ३५४ सदस्य पदांसाठी ३ हजार २९९ उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.

अशी आहे तालुकानिहाय मतदार संख्या..

तालुका ग्रामपंचायत पुरुष स्त्री एकूण

तेल्हारा २३ १६३५८ १४७७५ ३११३३

अकोट ३७ २७९६५ २४८९८ ५२८६३

मूर्तिजापूर ५१ ३०८२२ २७८६२ ५८६८४

अकोला ५४ २९६९७ २७२४२ ५६९४२

बाळापूर २६ १४२०४ १२९८१ २७१८५

बा.टाकळी ४७ २५०८७ २४५४१ ४९६२८

पातूर २८ १७७६२ १६०५२ ३३८१४

एकूण २६६ १६१८९५ १४८३५१ ३१०२४९

मतदान केंद्र निश्चित..

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१७ प्रभाग असून ८३३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात ७३, अकोट-१२८, मूर्तिजापूर-१६२, अकोला-१६६, बाळापूर-७८, बार्शीटाकळी- १४१, पातूरमध्ये ८५ असे एकूण ८३३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com