Akola District BJP: सावरकर प्रदेश कार्यकारिणीत, पिंगळे-थोरातांमध्ये रस्सीखेच, महानगराध्यक्षपदी अग्रवाल कायम?

Akola BJP District President: लवकरच भाजपच्या अकोला जिल्हाध्यक्षपदावर नव्याने नियुक्ती केली जाणार.
Randhir Sawarkar, Vijay Agrawal and Tejrao Thorat
Randhir Sawarkar, Vijay Agrawal and Tejrao ThoratSarkarnama

Akola BJP District President Change News : भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे लवकरच भाजपच्या अकोला जिल्हाध्यक्षपदावर नव्याने नियुक्ती केली जाणार, हे निश्‍चित आहे. या पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. (Randhir Savarkar on the post of General Secretary in the State Executive)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप संघटनात्मक बदल करणार आहे. भाजपने नुकतेच राज्याच्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये अनेकांना नारळ देत नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यानंतर आता राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती आहे. ही प्रक्रिया २० मे पूर्वी होणार, अशीही चर्चा भाजपच्या गोटात आहे.

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदांवर त्या-त्या जिल्ह्यांतील प्रभावशाली आमदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना बांधणीला प्राधान्य देण्यात आले. अकोला जिल्ह्यातही भाजपचे अध्यक्षपद आमदार सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली.

आमदार सावरकरांची कामगिरी बघून त्यांना प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता आमदार सावरकर यांचे वारसदार म्हणून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Randhir Sawarkar, Vijay Agrawal and Tejrao Thorat
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनाही पुन्हा संधी दिल्या जाण्याची शक्यता असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. नवीन चेहरा पुढे आणावयाचा झाल्यास अमित कावरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे सध्या भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आमदार ठरवतील जिल्हाध्यक्ष..

अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षावर खासदार संजय धोत्रे यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या आजारपणामुळे ही धुरा आमदार रणधीर सावरकर यांच्या खांद्यावर आली. सध्या त्यांचा शब्द हा भाजपमध्ये प्रमाण मानल्या जातो. त्यामुळे भाजपचा पुढील जिल्हाध्यक्षही त्यांच्या मर्जीनुसार निवडला जाणार असल्याची चर्चा अकोल्यातील राजकीय वर्तुळात आहे.

Randhir Sawarkar, Vijay Agrawal and Tejrao Thorat
Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

भाजपचे अकोला (Akola) महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांना पदावर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नियमानुसार आणखी एक टर्म त्यांना महानगराध्यक्षपदावर कायम राहता येते. सध्या विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वातच महानगरपालिकेची (Municipal Corporation) आगामी निवडणूक भाजप लढणार, अशी शक्यता आहे.

तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या..

भाजपच्या (BJP) तालुकाध्यक्षपदासाठी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या (Election) कार्यक्रमानुसार या नियुक्त्या केल्या जात आहेत. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांची नावे निश्चित झाली असून, उर्वरित नावांवरही लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. तालुकाध्यक्षपदावरही आमदार रणधीर सावरकर यांच्या निकवर्तियांनाच संधी दिली जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com