Akola APMC : राष्ट्रवादीचे वर्चस्व, धोत्रे गटाने राखली ४० वर्षांपासूनची सहकारातील सत्ता !

Shirish Dhotre : पुन्हा एकदा शिरीष धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली.
Akola APMC
Akola APMCSarkarnama

Akola APMC Election News : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीची निवड प्रक्रिया आज (ता. १८) पार पडली. बाजार समितीमध्ये सर्वाधिक १८ पैकी ११ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-समर्थक असल्याने अपेक्षेप्रमाणे धोत्रे गटाने वर्चस्व राखत सहकारातील ४० वर्षांपासूनची सत्ता कायम ठेवली आहे. (40 years of co-operative rule has been maintained)

सभापतिपदी पुन्हा एकदा शिरीष धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्याच गटाचे ज्ञानेश्वर महल्ले यांच्याकडे उपसभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महल्ले यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. अकोला बाजार समितीवर सहकार पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत असलेले ११ संचालक सभापती निवडणार हे निश्चित होते.

सभापतिपदासाठी शिरीष धोत्रे तर उपसभापतीसाठी ज्ञानेश्वर महल्ले यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शविल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केले. सहकार क्षेत्रावर वसंतराव धोत्रे यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्यानंतर त्यांचाच मुलगा शिरीष धोत्रे यांनी सहकारावर मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांच्याच नेतृत्वात सहकार पॅनलने यावर्षी अकोला बाजार समितीची निवडणूक लढविली होती.

धोत्रे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदांवरील नेत्यांचा ११ जागांवर विजय झाला. सरकार पॅनलमधील दुसरा मोठा गट भाजपचा होता. त्यांचे पाच संचालक अकोला बाजार समितीवर निवडून आले. तिसरा गट शिवसेना ठाकरे गटाचा होता. त्यांचे दोन उपजिल्हाप्रमुख बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले आहेत. भाजप व शिवसेनेच्या संचालकांनीही शिरीष धोत्रे व ज्ञानेश्वर महल्ले यांची निवड बिनविरोध व्हावी, म्हणून त्यांच्या नावावर पसंती दर्शविली.

Akola APMC
Akola riots : कॅमेऱ्यात जे दिसले, त्यांना अटक करून उपयोग नाही; त्याच्या मागे कोण, हे शोधा…

सलग चौथ्यांदा सभापती..

अकोला (Akola) बाजार समितीच्या सभापतिपदी शिरीष वसंतराव धोत्रे यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. त्यापूर्वी त्यांचे वडील वसंतराव धोत्रे यांनी सन १९६७ पासून अकोला बाजार समितीचे सभापतिपद सांभाळले होते. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून शिरीष धोत्रे यांनी अकोला बाजार समितीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. सन २००८ च्या निवडणुकीत (Election) पहिल्यांदा शिरीष धोत्रे यांची सभापतिपदी निवड झाली होती. यंदाही पूर्ण बहुमत असल्याने धोत्रे यांच्या गळ्यात पुन्हा सभापतिपदाची माळ पडली. अकोला बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, ८० कोटी पेक्षा अधिक भागभांडवल आहे.

बाजार समितीच्या (APMC) सभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाली. लोकांनी सहकार पॅनल व माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत बाजार समितीचा कारभार शेतकरी (Farmers) हिताच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न राहील. यापुढे बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या योजना राबविण्यावर भर दिला जाईल, असे शिरीष धोत्रे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com