अजितदादांनी फडणवीसांना सुनावले; ‘पाच अन्‌ सात काय करता?, मदतीचे बोला...’

विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या इतर भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व्याकूळ झालेला आहे, आत्महत्या करतो आहे, ही गंभीर परिस्थिती आहे. त्यासंदर्भात आम्ही सांगितलं की त्यावर तुम्ही नव्हता पाच जाण आणि तुम्ही नव्हता का सात? असे उलट सवाल विचारला जातो.
  Devendra Fadnavis-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama

वर्धा : विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व्याकूळ झालेला आहे, आत्महत्या करतो आहे. राज्यात गंभीर परिस्थिती आहे. त्यासंदर्भात आम्ही विचारलं की, त्यावर ‘तुम्ही नव्हता पाच आणि तुम्ही नव्हता का सात,’ असा उलटा सवाल विचारला जातो. मात्र, ते काही या परिस्थितीवरील उत्तर नाही. नुकसानाचे पंचनामे लवकर कसे होतील, शेतकऱ्यांना मदत कशी होईल, हे त्याला उत्तर पाहिजे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे कसे मिळेल, हे त्यावर उत्तर पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सुनावले. (Ajitdada told Fadnavis; What are doing five and seven, talk about help)

अजित पवार आज (ता. २९ जुलै) वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यावेळी वर्धा जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार बोलत होते. त्यावेळी पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला. मी मुख्यमंत्री यांना भेटलो होतो, काही प्रश्न मांडले होते, आता ज्या समस्या शेतकऱ्यांच्या पहिल्या, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटतो, वरवर नको तर कृती झाली पाहिजे.

  Devendra Fadnavis-Ajit Pawar
शिवसेनेला सोलापूरात पुन्हा धक्का; शहाजीबापू पाठोपाठ कोकाटे अन् क्षीरसागरही शिंदे गटात

विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेचे कारभार पाहतात, जोडीला कोणाला घेत नाहीत, असे आम्ही सांगायला गेलो तर उपमुख्यमंत्री फडणवीस काल म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच लोक होते. पण त्यांनी पाच चुकीचं सांगितलं. मागच्या सरकारमध्ये सुरुवातीला सात लोकांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश होता. त्यामधील काहीजण तर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशा ताकदीचं माणसं होती. त्यामध्ये एकनाथ शिंदेही होते आणि काहींना सात ते आठ टर्म आमदारकी भूषविलेले सर्व वरिष्ठ नेते आहेत.

  Devendra Fadnavis-Ajit Pawar
मोहिते पाटील, शहाजी पाटील, बबनदादा शिंदे हे आज खूष असतील...

आताच्या सरकारमध्ये फक्त दोघेच आहेत, त्यातून त्यांना मुंबईचाही व्याप बघावा लागतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी राज्यावर कुठलेही संकट नव्हते. निवडणुका होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं होतं. त्यामुळे त्यावेळी फार काही अडचणी आल्या नाहीत. आज मात्र ती परिस्थिती नाही. विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या इतर भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे व्याकूळ झालेला आहे, आत्महत्या करतो आहे, ही गंभीर परिस्थिती आहे. त्यासंदर्भात आम्ही काही सांगितलं की त्यावर तुम्ही नव्हता पाच जाण आणि तुम्ही नव्हता का सात, असे उलट सवाल विचारला जातो. मात्र, ते काही या परिस्थितीवरील उत्तर नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे लवकर कसे होतील, त्यांना मदत कशी होईल, हे त्यावर उत्तर आले पाहिजे. दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे कसे मिळेल, हे सांगितले पाहिजे. मात्र, या समस्यांवर तर कुणी बोलतच नाही, अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.

  Devendra Fadnavis-Ajit Pawar
Sangli ZP : संग्रामसिंह देशमुखांचा पत्ता कट तर सम्राट महाडिकांसाठी संधी

अजूनही पंचनामे झाले नाहीत, ही वास्तविकता आहे. दोघांचं मंत्रिमंडळ आहे, शेतकऱ्यांना मदतीसाठी वेळ लागतोय. मंत्रिमंडळाची बैठक होत नाही. आमच्या सरकारमध्ये सुरुवातील पाच नव्हे तर सात मंत्री होते. महत्वाचे खातेवाटप झाले होते, त्यामुळे व्याप मोठा आहे; म्हणून मदत आवश्यक आहे. केवळ पाच की सात आहे, हे म्हणणे योग्य नाही. फिल्डवर गेल्याने वास्तविकता कळते. शेतकऱ्यांना पिकांसाठी, पाळीव जनावरांचा मृत्यू झाला, घरं पडली, तर त्याची मदत झाली नाही, ही झाली पाहिजे, अशी अपेक्षाही अजितदादांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in